मुंबई : लाखो राम भक्तांच्या भावना दुखावणारा आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा 'अन्नपुर्णी' चित्रपट अखेर नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात आला आहे. निलेश क्रिष्णा यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि जतीन सेठी, आर रवीद्र, पुनीत गोयंका (झी एंन्टरटेंमेंन्ट) यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटात हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेच्या सदस्यांनी नेटफ्लिक्सच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन करत लवकरात लवकर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात यावा अशी मागनी केली होती. आणि काही वेळानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरुन काढून टाकण्यात आला आहे.
'अन्नपुर्णी' या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिची प्रमुख भूमिका असून ती एका पुजाऱ्याची मुलगी आहे. या चित्रपटात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारी देखील काही दृष्ये दाखवली गेली आहेत. तसेच, प्रभू श्री राम मांसाहारी होते असे वाल्मिकींच्या रामायणात लिहिले आहे असे संवाद चित्रपटाचा नायक फरहान याच्या तोंडी होते. दरम्यान, सर्व निर्मात्यांनी विश्व हिंदु परिषदेस लेखी स्वरुपात माफी मागितली आहे. या माफिनाम्यात लिहिले आहे की, आमच्या हिंदुंना दुखावण्याच्या कोणत्याही भावना नव्हत्या. मात्र, तरीही या माफिनाम्याद्वारे संबंधित समुदायाच्या भावना दुखावल्या आणि झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करू इच्छितो."
माजी शिवसेना नेते रमेश सोळंकी यांनी या चित्रपटाची आणि त्यातील आक्षेपार्ह संवाद आणि दृश्यांची दखल घेत अन्नपुर्णी चित्रपटाशी संबंधित नेटफ्लिक्स वाहिनी, दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच, लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी काही दृश्ये चित्रटात दाखवले गेले आहेत असे म्हणत सोळंकी यांनी महाराष्ट्र पोलीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्याकडे निर्माते आणि नेटफ्लिक्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.यानंतर आता नेटफ्लिक्सने अन्नपु्रणी चित्रपट काडून टाकल्यानंतर सोळंकी यांनी ट्विट करत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत.
या मुद्द्याबद्दल विश्व हिंदु परिषदेचे प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी 'महाएमटीबी'शी संवाद साधत, "नेटफ्लिक्सच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'अन्नपूर्णी' चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्यांबद्दल बजरंग दलाने तीव्र विरोध केल्यामुळे सदर फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आली आहे. बजरंग दलाच्या दणक्यामुळे या चित्रपटाचे निर्माते झी स्टुडिओने हिंदू समाजाची माफी मागितली आहे.सदर चित्रपटामध्ये एक ब्राह्मण मुलगी बिर्याणी बनविण्यापूर्वी नमाज पढते आणि त्यामुळे बिर्याणीची चव वाढते, तसेच हिंदू देवी देवता मांसाहारी आहेत अशा प्रकारची अत्यंत आक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद त्या दाखविण्यात आले होते. हिंदूंच्या भावनांवर आघात करण्याचा प्रयत्न या माध्यमातून वारंवार होताना दिसत आहे. माझी या निर्मात्यांना सूचना आहे की त्यांनी अन्य धर्मीयांच्या बाबतीत अशाच प्रकारचं दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न करावा,ज्यामुळे त्यांना लवकरात लवकर जन्नतची द्वारे उघडली जातील आणि त्यांच्या स्वागतासाठी ७२ हुर्या हजर असतील. या निमित्ताने अशा हिंदू विरोधी वाहिन्यांचे आणि चित्रपटांचे निर्माते यांना इशारा देत आहोत,यापुढे तुमचे हे प्रताप हिंदू समाज खपवून घेणार नाही. "नाठाळांचे माथी हाणू काठी "अशी आमच्या संतांची शिकवण आहे", अशा भावना व्यक्त केल्या.