शरद पवारांनी केली आव्हाडांची पाठराखण; म्हणाले जितेंद्र आव्हाडांनी श्रीरामाची...
10-Jan-2024
Total Views | 91
मुंबई : जितेंद्र आव्हाडांनी रामाचा अपमान केला नाही अस म्हणत. शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी "राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता. १४ वर्षे वनवासात राहणारा माणुस शाकाहारी कसा असु शकतो" असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भारतभर हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्य़ा. देशभरातून त्याचा हिंदूंनी तीव्र शब्दात निषेध केला होता.
राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाते नेते शरद पवार यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे आव्हाडांची भूमिका ही शरद पावरांची भूमीका आहे का असा प्रश्न अनेकांनी उपस्थीत केला होता. ९ जानेवारीला एका पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. तेव्हा त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी आव्हाडांनी रामाचा अपमान केला नाही अस मत व्यक्त केले आहे.
"राम असंख्य भारतीयांच्या आस्थेचा व श्रद्धेचा विषय आहे. भारतीयांच्या मनात रामाचे विषेश स्थान आहे. जितेंद्र आव्हाड चे बोलले ते वाल्मीकी रामायणात आपण शोधू शकतो. आव्हाडांना हे बोलण्याची आवश्यकता नव्हती पण त्यांनी रामाचा अपमान केलेला नाही" अस शरद पवार यावेळी म्हणाले.