आता भारतीय करणार रेल्वेने युरोपवारी! मोदींच्या मास्टरप्लानवर जी-२० मध्ये शिक्कामोर्तब
09-Sep-2023
Total Views | 60
नवी दिल्ली: अमेरिका, सौदी अरेबिया आणि इतर देश जी-20 शिखर परिषदेत भारत आणि युरोपसह अरब देशांना जोडण्यासाठी एक मोठा रेल्वे प्रकल्प आणि बंदर बांधण्यासाठी करारावर स्वाक्षरी करणार आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
सौदी अरेबिया आणि भारतासोबतच या प्रकल्पातील प्रमुख भागधारकांमध्ये संयुक्त अरब अमिराती आणि युरोपियन युनियन यांचा समावेश असेल. हा बहुपक्षीय करार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजनैतिक प्रयत्नांचे यश आहे. असे सांगण्यात येत आहे की, या प्रकल्पावर चर्चा करण्याचा करार जी-२० शिखर परिषदेच्या सर्वात ठोस परिणामांपैकी एक असू शकतो. या प्रकल्पामुळे भारत आणि युरोपमध्ये व्यापार सुलभ होईल. हा प्रकल्प भारत, खाडीतील देशांना आणि युरोपला आर्थिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ आणेल.