मुंबई : 'राईट्स लिमिटेड' अंतर्गत विविध पदांकरिता अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात राईट्स लिमिटेड मार्फत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता / सहायक प्रबंधक / प्रबंधक (सिगनल तथा टेलीकम्यूनिकेशनच्या एसएसई / जे.ई. या अधिकारी पदांसाठी ०७ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
राईट्स लिमिटेड अंतर्गत भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दि. ०५ सप्टेंबर २०२३ पासून सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १९ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. तसेच, उमेदवाराचे वय ५५ वर्षांच्या आत असणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, राईट्स लिमिटेडमधील रिक्त पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे त्यांच्या भारतातील विविध राज्यातील कार्यालय असणार आहे. तसेच, या सर्व पदांसाठी नियुक्ती केल्यानंतर सदर उमेदवारास त्याच्या पदानुसार निश्चित केलेल्या ७वा वेतन आयोगानुसार वेतन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी राईट्स लिमिटेडच्या
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.