CSB बँकेची ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ' दे दणादण ऑफर ' - खाते नसल्यास हे वाचाच .
ज्येष्ठांसाठी विशेष ऑफर - CSB Bank ने जेष्ठ नागरिक आणि महिलांठी विशेष योजना
मुंबई: भारतातील सर्वात जुन्या बँकापैकी एक The Catholic Syrian Bank Limited ( CSB Bank) ने ज्येष्ठ नागरिक आणि महिला खातेधारकांसाठी स्पेशल ऑफर बाजारात आणली आहे. ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र सेव्हिंग खाते आणि वूमन पॉवर सेव्हिंग खाते या दोन प्रकारची खाते योजना सुरू केली आहे.
बँकेच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, या खात्यावर अनेक प्रकारच्या सुविधा, लाभ असणार आहेत. लॉकर रेंटल, एअरपोर्ट विश्रामगृहाचा मोफत प्रवेश, व रुपे प्लाटिनम डेबिट कार्ड असे वेगवेगळे लाभ या खात्यावर मिळणार आहेत.
CSB बँकेच्या ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र सेव्हिंग अकाऊंटची वैशिष्ट्ये
१) महिन्याला १० लाख रुपये जमा करण्याची कमाल मर्यादा
२) CSB बँकेच्या एटीएमवर फ्री अनलिमिटेड एटीएम व्यवहार
३) फ्री अनलिमिटेड RTGS / NEFT व्यवहार ( मोबाईल व नेट)
४) डिमॅट खात्यावर पहिल्या वार्षिक मेटेंनस चार्जेस मध्ये सूट
CSB बँकेच्या महिला पॉवर सेव्हिंग अकाऊंटची वैशिष्ट्ये
१) व्याजदरात सुट
२) लोन प्रोसेसिंग फी मध्ये सूट
३) CSB बँकेतून खरेदी केलेल्या सोवर्जिन गोल्ड बाँड वर डिस्काउंट
४) पहिल्या वर्षी डिमॅट खात्यावर वार्षिक मेटेंनस चार्जेस मध्ये सूट
बँकेच्या माहितीनुसार रुपे प्लाटिनम डेबिट कार्ड सोबतच एअरपोर्ट विश्रामगृहाचा मोफत प्रवेश , २ किंवा त्याहून अधिक विमा कव्हरेज, मोफत आरोग्य तपासणी, वेगवेगळ्या ब्रँडवर विशेष ऑफर , इतर सूट व डिस्काउंट असे अनेक लाभ या खात्यावर मिळणार आहेत.
यासंबंधी बोलताना , 'आम्ही वय आणि लिंगापलीकडे आर्थिक स्वातंत्र्याचे महत्व खुल्या दिलाने मानतो. महिलांना प्रोत्साहन देत त्यांच्या सक्षमीकरणासाठी हे लाभ खास त्यांच्यासाठी डिझाईन केले आहेत. वरिष्ठ नागरिकांना अपेक्षित असलेल्या आर्थिक आधाराचाही विचार आम्ही यात केला आहे.' असे CSB बँकेचे रिटेल बँकिग हेड नरेंद्र दिक्षीत म्हणाले आहेत.