विशेष: चंद्रानंतर सूर्य अर्थव्यवस्थेसाठी खुला ?
आदित्य एल १ च्या उड्डाणाने खाजगी क्षेत्रातील स्टार्ट अप गुंतवणूक वेगवान होणार?
मोहित सोमण
चंद्रयानच्या ३ पार्श्वभूमीवर इस्त्रो ( Indian Space Research Organisation) ने आदित्य एल १ चे उड्डाण यशस्वीपणे केले आहे. यावेळी आदित्य मिशन सूर्यावर प्रयाण करणार आहे. ISRO च्या माहितीनुसार सूर्यावर पोहोचण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
या निमित्ताने खाजगी क्षेत्रातील स्टार्टअप ची गुंतवणूक हा उद्योग वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. २०२३ मध्ये या उड्डाणानंतर यावर्षी अजून ३ स्पेस मिशन उड्डाणे इस्त्रो मार्फत होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये व्यक्त केली केली गेली होती. या क्षेत्रातील मूलभूत अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी लागणारे भांडवल व लॉजिस्टिकस पाहता सरकारने याआधीच खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकींचा मार्ग मोकळा केला आहे.
देशातील अंतराळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या दोन वर्षी पहायला मिळाली. देशात या व्हेंचर मध्ये नोंदणीकृत १४० हून अधिक स्टार्ट अप गुंतवणूकीसाठी गुंतवणूक केली आहे. २०२० मध्ये या क्षेत्रात ९.६ बिलियनची गुंतवणूक २०२५ पर्यंत ९.६ बिलियन डॉलर्स पर्यंत होऊ शकते असे EY India च्या अहवालात म्हटले गेले आहे. देशात सद्यस्थितीत स्कायरूट, ध्रुवस्पेस, बेलाट्रिक्स अशा अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. संपूर्णपणे खाजगी क्षेत्राला गुंतवणूकीसाठी परवानगी मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसा आल्याने शासकीय संस्थेची मोनोपोली राहिलेली नाही. आर्थिक वर्ष २३ मध्ये ६२ मिलियन डॉलरची गुंतवणूक झाल्याचे रिसर्च फर्म ट्राक्सन ने नमूद केले आहे. ३ वर्षात तब्बल २५ स्टार्टअप ची संख्या वाढली.
खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक स्पेस टेक मध्ये झाल्यावर त्याचे संभाव्य फायदे -
१) प्रचंड प्रमाणात गुंतवणूक आल्याने तंत्रज्ञान अत्याधुनिकीकरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला दुप्पट ते तिप्पट गती येऊ शकते.
२) वाढलेल्या खाजगी गुंतवणूकीमुळे FDI ( Foreign Direct Investment) मध्ये वाढ होणार आहे.
३) इंजिनिअर, उद्योजक, शास्त्रज्ञ यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळे नवीन उत्पादने निमिर्तीसाठी प्रोत्साहन होईल.
४) कॅमेरा, रिमोट सेन्सिंग उपकरणे, Satelite सेवा सुविधांमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण होईल.
५) उपग्रहामुळे हवामान, पर्यावरण, व विज्ञानातील बारकावे लक्षात घेऊन काटेकोर सेवा सुविधा देणे शक्य होईल. याशिवाय जीपीएस, आयटी सुविधा, कम्युनिकेशन्स या क्षेत्राला नवीसंजीवनी मिळू शकते.
यापूर्वी INSPACe ( इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन आणि अथोरायझेशन) चे अध्यक्ष पवन गोयंका यांनी मिडियाला दिलेल्या मुलाखतीत कमीत कमी १० टक्के मार्केट सहभाग असण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ असे २०२१ मध्ये सांगितले होते.
स्पेसटेक अनालिटिक्सनुसार, जगातील 3.6% स्पेस-टेक कंपन्यांसह (2021 पर्यंत) भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा खेळाडू आहे. अंतराळ-तंत्रज्ञान इकोसिस्टममधील सर्व कंपन्यांपैकी 56.4% कंपन्या अमेरिकेत अस्तित्वात आहेत. यानंतर ब्रिटन (6.5%), कॅनडा (5.3%), चीन (4.7%) आणि जर्मनी (4.1%) यांचा समावेश आहे. परंतु सरकार आणि इस्त्रो मार्फत खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकीला बंधने देखील आहेत. २०२० मध्ये लोकसभेत याच्या नवीन तरतूदी घोषित करण्यात आल्या होत्या.
एकंदरच येणाऱ्या आर्थिक वर्षात खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक स्पेस सेक्टर मध्ये आल्यास मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान, Raw Material, माहिती तंत्रज्ञान यात खूप मोठे बदल होऊ शकतात. आदित्य एल १ चे मिशन पूर्णत्वास गेल्यास सूर्यावर सखोल अभ्यास करून सौरऊर्जे बद्दल नवीन माहिती उघडकीस येऊ शकते. यातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेला किती चालना मिळेल याचे उत्तर आगामी काळच ठरवेल.