मुंबई : नॉर्दर्न कोलफील्ड अंतर्गत तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. नॉर्दर्न कोलफील्ड अंतर्गत नोकरभरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून नॉर्दन कोलफील्ड मध्ये “शिकाऊ प्रशिक्षणार्थी“ पदाच्या एकूण ११४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
नॉर्दर्न कोलफील्ड अंतर्गत भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेदवारास अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे तर वयोमर्यादा १८ ते २६ वर्षेदरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
नॉर्दर्न कोलफील्ड अंतर्गत भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.