मुंबई : गेट GATE (Graduate Aptitude Test for Engineering) २०२४ करिता नोंदणीप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या नोंदणीप्रक्रियेसाठीची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे गेटसाठी जर एखाद्या उमेदवारास अर्ज करावयाचा असल्यास आज शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन गेट परीक्षा नोंदणी विंडो आज बंद होईल.
दरम्यान, अभियांत्रिकीमधील पदवीधर (मानद) अभियोग्यता चाचणी GATE (Graduate Aptitude Test for Engineering) ची नोंदणी विंडो आज म्हणजेच २९ सप्टेंबर २०२३ रोजी बंद होणार आहे. अशा परिस्थितीत, या परीक्षेसाठी पात्र असलेले आणि ऑनलाइन फॉर्म भरू इच्छिणारे उमेदवार त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरू शकतात.
gate2024.iisc.ac.in ही गेट परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट आहे. जर कोणत्याही उमेदवाराला हा ऑनलाइन फॉर्म भरण्यास उशीर झाला तर त्याने काळजी करू नये.
तसेच, नोंदणीकरिता निश्चित असलेली मुदत संपल्यास जर एखाद्या उमेदवाराला हा ऑनलाइन फॉर्म भरण्यास उशीर झाला, तर काळजी करण्याची गरज नाही. हा फॉर्म ऑफलाइन पद्धतीनेही भरता येतो. परंतु ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर आहे ज्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.