नवी दिल्ली : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक यंदा भारतात ५ ते ९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान होणार आहे. त्या विश्वचषक स्पर्धेची सुरूवात ५ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील 'नरेंद्र मोदी स्टेडियम'वर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. त्या सामन्यादरम्यान हल्ला करण्याची धमकी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने यांने दिली आहे. '५ ऑक्टोबरला क्रिकेट विश्वचषक नव्हे तर 'वर्ल्ड टेरर कप' सुरू होईल' , अशी धमकी भारतातील अनेकांना ब्रिटनच्या क्रमांकावरून फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.
फोन नंबर +४४ ७४१८ ३४३६४८ वरून आलेल्या या कॉलमध्ये, प्री-रेकॉर्ड केलेला ऑडिओ प्ले झाला होता. यामध्ये गुरपतवंत सिंग पन्नू म्हणतो, “आम्ही शहीद निज्जर यांच्या हत्येबाबतच्या विरोधात मतपत्रिका वापरणार आहोत. आम्ही तुमच्या हिंसाचाराच्या विरोधात मतदान करणार आहोत. या ऑक्टोबरमध्ये क्रिकेट विश्वचषक होणार नाही, ५ ऑक्टोबरपासून 'वर्ल्ड टेरर कप' सुरू होईल. हा संदेश गुरपतवंत सिंग पन्नू, एसएफजे (शिख फॉर जस्टिस) च्या जनरल कौन्सिलचा आहे.
एसएफजेच्या दहशतवाद्यांनी कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना, विशेषत: तेथील भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांना धमकावले आहे. खलिस्तानी दहशतवादी गटाने भारताला ओटावा येथील दूतावास बंद करून तेथे तैनात असलेल्या मुत्सद्दींना परत बोलावण्याचा सल्ला दिला आहे. या मेसेजमध्ये भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा अपमान केल्याचे म्हटले आहे. गुरपतवंत सिंग पन्नू आणि कॅनडातील लोकांच्या वतीने मोदी प्रशासनाला दूतावास बंद करून राजदूताला परत बोलावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गुरपतवंत सिंग पन्नू यांनी 'कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोचा अपमान केल्याबद्दल' पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उच्चायुक्त संजय वर्मा यांना जबाबदार धरू, अशी धमकी दिली आहे. हा फोन कॉल आयपी-कॉल सेवेचा वापर करून करण्यात आल्याचे दिसते. पत्रकार आदित्य राज कौल हे फोन कॉल आलेल्यांपैकी एक आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसाठी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताला जबाबदार धरले आहे, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे.