ऑटो स्क्रॅप सेंटर उभारण्यासाठी गुंतवणूक आवश्यक - नितीन गडकरी
नवी दिल्ली: ऑटो स्क्रॅप सेंटर उभारण्यासाठी गुंतवणूक आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना केले आहे. स्वयंचलित पद्धतीने चालणारी टेस्टिंग सेंटर व वाहन स्क्रॅप सुविधेसाठी ही गुंतवणूक आवश्यक असून यात वाहन स्क्रॅप करण्यात येणाऱ्या वाहनमालकाला किंमतीत सूट द्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
गेले काही दिवस गडकरी व केंद्र शासनाच्या वतीने या स्वयंचलित स्क्रॅप सेंटरला विशेष प्राधान्य दिले जाते आहे. या क्षेत्रातील विकासासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. 'सगळ्यांंनी पुढे येऊन या प्रकल्पांना हातभार लावावा. यातून सगळ्यांसाठीच Win Win परिस्थिती निर्माण होऊन असे गडकरी यावेळी म्हणाले.
रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडून केलेल्या विधानाचा दाखला देत गडकरींनी' हे धोरण ऑटोमोबाईल व्यवसायात फायदेशीर धोरण आहे. सगळ्यांनी पुढे येऊन या धोरणाला साथ द्यावी.' असे गडकरी यावेळी म्हणाले.
जुनी, असुरक्षित, प्रदूषण करणारी वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकून त्याजागी नवीन, सुरक्षित आणि इंधन-कार्यक्षम वाहने आणण्याच्या उद्देशाने सरकारने 2021 मध्ये स्वयंसेवी वाहन-फ्लीट आधुनिकीकरण कार्यक्रम (वाहन स्क्रॅपिंग धोरण) सुरू केला होते.