आर्थिक वर्ष २४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जागतिक मंदी व्यतिरिक्तही ६ टक्क्याने वाढले - S & P ग्लोबल रेटिंग अहवाल
नवी दिल्ली: S&P ग्लोबल रेटिंग ने भारताविषयी सकारात्मक कौल दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंदी,पाऊस,वाढलेले व्याजदर अशा पार्श्वभूमीवर देखील भारताचा विकास दर ६ राहिल असे भाकीत S & P ग्लोबल रेटिंगने केले आहे.
अमेरिकेतील S&P ग्लोबलने नुकतीच झालेल्या तात्पुरत्या भाज्यांची दरवाढीमुळे आधीच्या ५ टक्यांवरून कमाल ५.५ टक्के घाऊक महागाई दर असेल असे यात त्यांनी म्हटले आहे.सध्याच्या विकासदरात मात्र वृद्धी होऊन सध्या ६ टक्के विकासदर असेल व येणाऱ्या आर्थिक वर्ष २४-२५ ,२५-२६ मध्ये ६.९ टक्क्यांपर्यंत हा दर वाढेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
सध्याचा विकासदर २०२२ पेक्षा कमी असला तरी मात्र भविष्यातील परिस्थिती मात्र आशादायी आहे.सध्याच्या भारताच्या अर्थव्यवस्थेत वेगाने येणारी तेजी बघता आम्ही २०२४ पर्यंत हे ठोकताळे आम्ही ठरवत आहोत.आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंदी, पाऊस, वाढलेले व्याजदर अशा पार्श्वभूमीवर देखील भारताचा विकास दर ६ राहिल असे भाकीत S&P ग्लोबल रेटिंगने केले आहे.असे S & P ग्लोबलने आशिया पॅसिफिक आऊटलूक २०२३ रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
भारताची अर्थव्यवस्था २२-२३ मध्ये ७.२ टक्यांने वाढली होती.जून तिमाहीत वापरात वाढ,वापरातील खर्च पाहता अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे.