अंबरनाथमध्ये आगीच्या किरकोळ घटना; अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

    24-Sep-2023
Total Views | 35
Fire incidents In Ambernath City

अंबरनाथ :
अंबरनाथमध्ये शनिवारी उशिरा आग लागण्याचा दोन घटना घडल्या मात्र अग्निशमन यंत्रणेने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने जीवितहानी टळली आहे. अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या. मात्र अंबरनाथ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने व त्यांच्या टीम ने या दोन्ही आगीच्या घटनांवर मोठ्या शिताफीने ताबा मिळवल्याने या ठिकाणी कोणताही मोठा अपघात झाला नाही. अन्यथा जीवितहानी होऊ शकली असती.

येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

दरम्यान, शहराच्या पूर्व भागातील पालेगाव येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शॉकसर्किटमुळे आग लागली होती. या घटनेची खबर मिळताच अवघ्या काही मिनिटांत अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत लागलेली आग आटोक्यात आणली. तर पश्चिम भागातील फॉरेस्ट नाका येथील हनुमान नगरमध्ये दिव्याच्या आगीने पेट घेतल्याने या ठिकाणी दोन सिलेंडर देखील ब्लास्ट झाले अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलप्रमुख भागवत सोनोने यांच्या पथकाने दोन्ही जागी लागलेल्या आगीच्या नियंत्रण मिळवत कोणतीही मोठी घटना होऊ दिली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121