आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत ५ पदकांची कमाई

    24-Sep-2023
Total Views | 42


नवी दिल्ली : चीनच्या हांगझाऊ येथे १९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भारताने आतापर्यंत ५ पदकांची कमाई केली आहे. २०२२ साली कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे या स्पर्धेस रद्द करण्यात आले होते. तीच स्पर्धा आता घेण्यात येत आहे. यात भारताने यशस्वी घोडदौड सुरू केली असून ३ रौप्यपदकांसह ५ पदके मिळविली आहेत.


येथे क्लिक करा >>  ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!


यामध्ये १० मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग) रौप्यपदक, पुरुषांची लाईटवेट डबल स्कल्स (रोईंग) रौप्यपदक, त्यानंतर पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोईंग) कांस्यपदक, पुरूष कॉक्सड ८ संघ (रोईंग) रौप्यपदक, महिला १० मीटर एअर रायफल (शूटिंग) कांस्यपदक या पदकांचा समावेश आहे.
भारतीय संघाची उझबेकिस्तानवर १६-० अशी मात

भारतीय हॉकी संघाने १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उझबेकिस्तानला १६-० अशा मोठ्या फरकाने नमविले आहे. भारताकडून ललित उपाध्यायने सर्वाधिक चार गोल केले तर वरुण कुमार आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी ३ गोल केले. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत ५ पदके मिळाली असून ३ रौप्यपदके तर २ कांस्यपदकांचा समावेश आहे. दरम्यान, भारताचा पुढील सामना सिंगापूरशी होणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121