नागरिकांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात जाणार!

    23-Sep-2023
Total Views | 41

devendra fadanvis

नागपुर : 
ढगफुटी सदृश पाऊस दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नागपुरात पडला. या चार तासात तब्बल ११० मिलीमीटर पाऊस झाल्याने पूर परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शनिवारी सकाळी नागपुरला गेले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी नागपुरला जाणार असल्याची माहिती स्वत: फडणवीसांनी दिली.

अचानकन झाल्याले अतिवृष्टीमुळे अंबाझरी तलाव ऑव्हर फ्लो होऊन नागा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नाग नदीच्या किनाऱ्यावरील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली. पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर आणि नंदनवन या भागात रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तरी संध्याकाळपर्यंत परिस्थिती ओसरेल, असे फडणवीसांनी सांगितले.

नागपुर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार एका वृद्ध महिलेचा मृत्यु झाला असून पूराच्या पाण्यात १४ जनावरे वाहून गेली आहेत. या पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि लष्करी जवानांच्या तुकड्यांकडुन रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहे. हे काम युद्धपातळीवर सुरु असुन आतापर्यंत अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या नागरिकांसाठी तात्पुरते राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

नागपुरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्ये बदल केले”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

"काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्ये बदल केले”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

(PM Narendra Modi On Waqf Amendment Bill) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यामुळे विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटलं होतं की, धर्माच्या आधारावर आरक्षणाला स्थान नसावं. पण काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्येही बदल केले”, असा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121