पूरग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपये तातडीची मदत; केंद्रीय मंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा

    23-Sep-2023
Total Views | 33
 Meeting On Flood Situation At Nagpur Municipal Corporation office

नागपूर :
मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या स्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत एका बैठकीतून आढावा घेतला. नागपूर पूरग्र्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी ५० हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना १० हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार, अशा घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर केल्या.

नागपुरात झालेल्या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, शहराला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. या बैठकीला कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, संदीप जोशी, तसेच इतरही लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि इतर उपस्थित होते.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अवघ्या ४ तासात झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्यातही केवळ २ तासात ९० मि.मी. पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि नागनदी, पिवळी नदी लगतचा परिसरात पाणी शिरले. यामुळे रस्ते, पुलांची क्षती झाली. नाल्याजवळच्या भींती पडल्या, घरात पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. सुमारे १० हजार घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रारंभिक अंदाज आहे. त्यांना तातडीची मदत १० हजार रूपये देण्यात येईल. गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देईल. जेथे दुकानांची क्षती झाली, त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत देणार. टपरी व्यवसायिकांना नुकसानीसाठी १० हजारापर्यंत मदत देण्यात येईल. शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने सर्व टीमची तैनाती कायम ठेवण्यात आली आहे. पोलिस विभाग सुद्धा सज्ज आहे.

शनिवारी पहाटेपासून निर्माण झालेल्या या स्थितीनंतर वीज बंद करण्यात आली होती, ती बहुतेक ठिकाणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. १४ ट्रान्सफॉर्मर अजून सुरु केलेले नाहीत कारण, तेथे पाणी कमी होण्याची वाट पाहिली जात आहे. तेथे ओलावा कायम आहे. कुठलाही अनर्थ होऊ नये, म्हणून वीज बंद आहे. सकाळपर्यंत ती सुरु करण्यात येईल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पहिल्या तीन तासातच लोकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाने केले. एनडीआरएफ, एसडीआरएफचा यात मोठा वाटा आहे. रिस्पॉन्स टाईम हा चांगला होता आणि त्याचे कौतूक केले पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा
शिक्षण क्षेत्रात युट्युब करणार महाराष्ट्राला सहकार्य

शिक्षण क्षेत्रात युट्युब करणार महाराष्ट्राला सहकार्य

भारतात 'क्रिएटिव्हिटी'ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर 'क्रिएटिव्हिटी' असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला...

महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे

महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन :पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

महाबळेश्वर येथे दि.२ ते ४ मे २०२५ रोजी 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर इथे ६० पंचतारांकित टेंट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. लेझर शो,विविध पर्यटन सहली,सांस्कृतिक कार्यक्रमांचे २ ते ४ मे रोजी आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121