मुंबई : वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे “वैद्यकीय अधिकारी“ पदांच्या एकुण १३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच, सदर पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील रिक्त भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख दि. २६ सप्टेंबर ते दि. १० ऑक्टोबर २०२३ असणार आहे.