सनातन धर्मविरोधी वक्तव्य – सर्वोच्च न्यायालयाची स्टॅलिनला नोटीस
22-Sep-2023
Total Views | 32
नवी दिल्ली : सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली आहे.
उदयनिधी स्टॅलिन आणि ए. राजा यांच्या सनातन धर्माविरोधी वक्तव्यांवरी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. द्वेषपूर्ण भाषणाबाबत प्रलंबित असलेल्या इतर याचिकांसह या प्रकरणाची सुनावणी होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. बी. जगन्नाथ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्या. बेला. एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह द्रमुकचे खासदार ए. राजा, खासदार थिरुमावलावन, खासदार व्यंकटेशन, तामिळनाडूचे पोलिस महासंचालक, ग्रेटर चेन्नईचे पोलिस आयुक्त, केंद्रीय गृह मंत्रालय, हिंदू धार्मिक आणि धर्मादाय विभागाचे मंत्री पी. के. शेखर बाबू, तामिळनाडू राज्य अल्पसंख्याक आयोग यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.