MahaMTB Exclusive : बाप्पात दडलेय गुंतवणूकीचे अनोखे प्रतिबिंब
गणरायांचे आगमन झाले आहे! तब्बल 10 दिवसांचा हा सण आनंद, उत्सव आणि सर्वांना एकत्र येण्याचे एक शुभपर्व आहे. लोकांच्या घरात,सोसायट्यांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात आणि अतिशय धुमधडाक्यात साजरा होतो.‘गणपती बाप्पा मोरया!’चा गजर आणि ‘मोदका ’चा गोड प्रसाद या उत्सवाचा आणि मंगलमय वातावरणाचा आणखी उत्साह वाढवतो.हिंदू परंपरेत गणरायांना विशेष स्थान आहे.त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणजेच भक्तांवरील संकट अथवा अडथळे दूर करणारे बाप्पा म्हणून ओळखले जातात.
नवीन कार्याचा शुभारंभ करण्यापुर्वी गणपती बाप्पाची नेहमी मनोभावे प्रार्थना केली जाते.भगवान गणेशाच्या रूपाभोवती अनेक कथा आणि प्रतीके गुंफली गेलेली आहेत.त्याचे हत्तीचे डोके हे बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे तर त्याचे मोठे कान एकाग्रतेने ऐकण्यासाठी दक्ष आहेत,त्याचे शरीर शक्ती आणि सामर्थ्य दर्शवते तर त्याचे वाहन,उंदीर नम्रतेचे प्रतीक म्हणून परिचित आहे. गणपतीच्या मूर्तीकडे पाहिल्यास अनेकदा डाव्या बाजुचा त्याचा दंत खंडीत रुपात दिसतो.पौराणिक कथेनुसार,महाभारत लिहिणारे महर्षी वेद व्यास यांना त्यांच्या मनातअवतरलेली कथा कोणीतरी लिहावी,अशी इच्छा प्रकट झाली होती.पृथ्वीवर इतक्या वेगाने लिहू शकणारे कोणीही नव्हते.म्हणून त्यांनी भगवान गणेशाकडे मदत मागितली.मनोमन प्रसन्न झालेल्या श्रीगणेशाने त्यांना मदत करण्याचे मान्य केले.गणरायांनी सामान्य मोरपिसाची लेखणी वापरून कथा लिहायला सुरुवात केली.
तथापि, श्रुतलेखाच्या मध्यभागी मोरपिसाचे टोक अचानक तुटले.गणेशा,लिखाण अजिबात थांबू इच्छित नव्हते, त्यांनी आपल्या डाव्या दंताचे टोक तोडले आणि त्याच्या सहाय्याने लिखाण पुढे सुरू ठेवले. त्यांच्या या समर्पणवृत्तीमुळे तसेच वचनबद्धतेमुळे हिंदू परंपरेतील एक महत्त्वाचे महाकाव्य आपल्या सर्वांसाठी कायस्वरुपी आकारास आले.
गणरायांची ही कथा आपल्याला अडथळ्यांना न जुमानता सातत्य आणि समर्पणाची शक्तीची शिकवण देते.गुंतवणुकीत आणि जीवनात अनेकदा आपण एखादी गोष्ट मोठ्या उत्साहाने सुरू करतो आणि जेव्हा आपल्याला पहिला अडथळा येतो,तेव्हा तेथेच थांबतो.प्रत्येक 1 जानेवारीला,आपण अनेक जण व्यायामशाळेचे सदस्यत्व घेतो आणि लवकरच आपण दररोजच्या जीवनात इतके व्यस्त होतो की,आपल्याला फिटनेसचा विसर पडून जातो.
अगदीच अशाच प्रकारे आपण आर्थिक उद्दिष्टांसाठी गुंतवणुकीचा प्रवास धुमधडाक्यात सुरू करतो,परंतु बाजार अस्थिर होताच किंवा त्यात घसरण होताच,आपण एसआयपी थांबवतो आणि गुंतवणूकीच्या मुदतपुर्तीपुर्वीच म्हणजेच परिपक्तवेपुर्वी आपली गुंतवणूक काढून घेऊ शकतो.वेळेआधी एसआयपी बंद करणे महागात पडते.पण कल्पना करा की इतर कामांची,उद्दीष्टांची जबाबदारी असतानासुध्दा त्याचे बिलकूल ओझे न बाळगता आपण जिमला जात राहिलो किंवा बाजारातील चढउतार असूनही गुंतवणूक सुरूच ठेवली,तर त्याचे काय परिणाम होईल?या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आपण काही आकडेवारी तपासून पाहू या.
बाजारातील प्रत्येक घसरणीवर एखाद्याने वेळेपूर्वी त्यांची गुंतवणूक थांबवली तर काय होते ते पाहू या.समजा श्री.एजी यांनी 1 सप्टेंबर 2018 ला दरमहा2,000 रुपयांची एसआयपी सुरू केली.त्यांनी गुंतवणूक निफ्टी फिफ्टी या निर्देशांकात केली आहे,असे गृहीत धरू या.मार्च 2020 मध्ये शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली.श्री.एजींची गुंतवणुकीची स्थिती कशी आहे,हे पाहू या, समजा त्यांनी या घसरणीच्या वेळी आपली गुंतवणूक काढून घेत ती मुदत ठेवींकडे वळविली होती आणि याच्याविरुद्धची स्थिती म्हणजे त्यांनी गुंतवणूक कायम ठेवली होती.
गुंतवणूकीचा तक्ता
--------------------------------------------------------
Redeemed Stayed invested
Monthly SIP Amount 2,000 2,000
Total Amount Invested 38,000 120,000
XIRR (%) Loss 15.4%
Value of Investment on 31 st Mar 20 29,000 29,000
Final Amount (in Rs) * 0n 31 st Aug 23 35,147 176,247
2020 च्या अस्थिरतेनंतरही श्री.एजी यांनी त्यांची एसआयपी सुरूच ठेवली असती,तर आता त्यांच्याकडे अंदाजे एक लाख 76 हजार रुपयांचा निधी जमा झाला असता.तुमच्या संपत्ती निर्मितीच्या कथेत सातत्य हा घटक कशी मोठी भूमिका बजावू शकतो, हेदर्शवणारे हे एक छोटेसे उदाहरण आहे. तर,आयष्यातील इतर कामाच्या ओझ्याला न जुमानता आपण व्यायामशाळेत जात राहिलो किंवा बाजारातील चढउतार असूनही आपली गुंतवणूक सुरूच ठेवली, तर परिणाम काय होईल? एक आरोग्यपुर्ण आणि उत्तम विचारशैली आपल्याला नेहमी उत्तम व्यक्ती म्हणूनच घडवते. हे लक्षात घेऊन,आपल्या गुंतवणुकीचा श्रीगणेशा आजच करूया!
-----------------
श्री सुरेश सोनी, सीईओ, बडोदा बीएनपी परिबास म्युच्युअल फंड