जयपूर : आगामी विधानसभा निवणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अशोक गेहलोत यांच्याबद्दल त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
यावेळी पुष्कर सिंह धामी यांनी गेहलोत सरकार केंद्राकडून मिळालेला पैसा येथील लोकांसाठी खर्च करत नसल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, राजस्थानमध्ये गेल्या ५ वर्षांपासून असे सरकार आहे जे केंद्राकडून मिळालेला पैसा राजस्थानमध्ये गुंतवू इच्छित नाही. तसेच येथील लोकांचे भलेही करू इच्छित नाही, असे पुष्कर सिंह धामी म्हणाले.
यासोबतच भ्रष्टाचाराच्या बाबतीत राजस्थान पहिल्या नंबरवर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. तसेच राजस्थान सर्व गुन्ह्यंची संख्या ओलांडताना दिसत आहे, असेही पुष्कर सिंह धामी यांनी म्हटले आहे.