
कच्च्या तेलाचा वाढत्या किंमतीतही आर्थिक वर्ष २४ मध्ये भारताचा जीडीपी दर ६.५ टक्के - अरविंद विरमानी
नवी दिल्ली:भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक अंशी सुगीचे दिवस आलेले असतानाच देशाची 'ब्रेन' संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निती आयोग सदस्य अरविंद विरमानी यांनी मोठे विधान केले आहे.क्रुड तेलाच्या चढे भाव, ' क्लायमेट चेंज ' सारख्या अस्थिरतेच्या परिस्थितीतही भारत ६.५ टक्के विकासदराने भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २४ मध्ये पुढे जाईल असे भाकीत विरमानी यांनी गुरुवारी केले आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत,' माझ्या मते अर्थव्यवस्थेचा विकासदर ६.५ टक्के किंवा ०.५ टक्के इकडे तिकडे जवळपास राहिल.माझ्या अनुभवानुसार जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थेतील बदलातही भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा अमुलाग्र बदल होत नाही.त्यामुळे किरकोळ बदल होऊ शकतात.'असे विधान त्यांनी केले आहे.
भारताची अर्थव्यवस्थेतील प्रगती ही फुगवून केलेल्या उभे केलेले चित्र असल्याच्या अमेरिकेतील अर्थशास्त्रींचा टीकेवरही विरमानी यांनी भाष्य केले आहे.संबंधित अर्थशास्त्री केवळ अकादमी पार्श्वभूमीचे असल्याने जीडीपी चे वस्तुतः मोजमाप कसे होते याची त्यांना कल्पना नसेल असेही विधान विरमानी यांनी केले आहे.मागील आठवड्यातही वित्त मंत्रालयाने हे आरोप फेटाळले होते.
भारताचा जीडीपी दर आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये ७.२ टक्के इतका होता.जो त्या आधी आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये ९.१ टक्के इतका नोंदवला गेला होता.