पॉडकास्ट इकोसिस्टीम वृद्धीसाठी कुकु एफएम ची ' इतक्या ' मिलियन डॉलरची गुंतवणूक

ऑडिओ इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी कुकु चे मोठे पाऊल. कुकु एफएम मध्ये नवीन २५ मिलियन डॉलरची गुंतवणूक

    21-Sep-2023
Total Views | 30
Kuku
 
पॉडकास्ट इकोसिस्टीम वृद्धीसाठी कुकु एफएम ची ' इतक्या ' मिलियन डॉलरची गुंतवणूक
 
ऑडिओ इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी कुकु चे मोठे पाऊल. कुकु एफएम मध्ये २५ मिलियन डॉलरची गुंतवणूक
 
नवी दिल्ली:सध्या ऑडिओ प्लॅटफॉर्म व पॉडकास्ट इंडस्ट्रीची चर्चा सर्वत्र चालू असताना त्यातील आघाडीचे नाव 'कुकु एफएम ' ने २५ मिलियन डॉलरची गुंतवणूक नुकतीच प्राप्त केली आहे.कुकु एफ एम मध्ये सिरीज सी फंडिग राऊंड अंतर्गत The Fundamentrum Partnership,International Finance Corporation ( IFC) व Vertex Ventures यांच्या संयुक्त विद्यमानाने ही गुंतवणूक केली गेली आहे.कंटेट इकोसिस्टीम सक्षम करण्यासाठी हा निर्णय कंपनीच्या वतीने घेण्यात आला आहे.वाढती स्पर्धा, वाढलेला खर्च आणि त्यासाठी आवश्यक गुंतवणूक यासाठी हे कॅपिटल इनफ्यूजन करण्यात येईल.
 
भारत २.० साठी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषांमध्ये कंटेंट वाढवण्यासाठी कंपनीचा प्रयत्न आहे.ऑडिओ प्लॅटफॉर्म, पॉडकास्ट व विविध स्वरुपातील कंटेंट ऐकणारा वर्ग विशेष करून शहरी भागात वाढला आहे. ७०० दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांपैकी निम्म्याहून अधिक बिगर-शहरी भारताचा कल लक्षात घेता,"भारत 2.0 सेगमेंटवर लक्ष केंद्रित करणारे व्यवसाय मॉडेल तयार करून नफ्यासोबतच शाश्वत व्यवसाय मॉडेल तयार करण्याच्या आमचा प्रयत्न असेल"असे कुकू एफएमचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लालचंद बिसू यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
 
नंदन निलेकणी यांच्या Fundamentum Partnership बरोबर कुकु एफएम ने नवीन डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी याआधीही २१.९ मिलियन डॉलरचे भांडवल सिरीज बी १ मध्ये तयार करण्यात आले होते.कुकु एफएम ची स्थापना लालचंद बिसू, विकास गोयल,विनोद कुमार मीना यांनी २०१८ मध्ये केली होती.सध्याच्या घडीला कुकुचे २.५ मिलियनहून अधिक सबस्क्राईबर आहेत.१५०००० हून अधिक तासांचा कंटेंट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.याव्यतिरिक्त बुक समरी, कोर्सेस याची सुविधा कुकुवर उपलब्ध आहे.पॉडकास्ट व इतर कंटेंट कर्त्यांसाठी यावर कंटेंट तयार करण्याचे टूलही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 
मागे प्रसिद्ध झालेल्या Redseer रिपोर्टनुसार,पॉडकास्ट स्ट्रीमिंग मध्ये एका वर्षात १.६ पटीने सबस्क्राईबर वाढले आहेत.छोट्या शहरात देखील या सेंगमेट मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121