नेहरुंनी मुस्लिमांचा विश्वासघात केला; असदुद्दीन ओवेसींचे वक्तव्य

    20-Sep-2023
Total Views |
OWESI 
 
नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकारने महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदन हे विधेयक आणले आहे. या विधेयकावर आज संसदेत चर्चा सुरु आहे. याच चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.
 
असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, "१९८४ पासून गुजरातचा एकही मुस्लिम खासदार का झाला नाही? मी संविधान सभेत सरदार पटेल आणि नेहरूंवर मुस्लिम समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप करतो. ते प्रामाणिक असते तर या सभागृहात मुस्लिमांचे प्रतिनिधित्व जास्त झाले असते."
 
असदुद्दीन ओवेसी यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला आहे. या विधेयकात मुस्लिम महिलांना आरक्षण का देण्यात आले नाही, असा सवाल ओवेसी यांनी केला. त्याचबरोबर महिला आरक्षण विधेयक हे निवडणूक जिंकण्यासाठी केलेला राजकीय स्टंट आहे, असा आरोप ओवेसींनी केला.