“पैसा नसलेल्यांना निर्माते का म्हणावे?”, शशांकचा खोचक प्रश्न

    02-Sep-2023
Total Views | 30
 
shashank ketkar
 
 
मुंबई : कलाकारांना योग्य वेळेत त्यांच्या कामाचे मानधन मिळत नाही असी तक्रार वारंवार मालिका, चित्रपट किंवा अन्य कलाकारांकडून केली जात आहे.. निर्मात्यांकडून मानधन न मिळाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा अभिनेता शशांक केतकर याने उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. ठरलेल्या कामाचे, वेळेत पैसे मिळावे इतकी प्रत्येक कलाकारांची माफक अपेक्षा असते. असं त्याने यापुर्वी म्हटले होते. आता पुन्हा एकदा एका निर्मात्यानं त्याच्या चित्रपटाचे मानधन थकवल्याने शशांकने राग व्क्त करणारी पोस्ट समाज माध्यमावर केली आहे.
 
काय म्हणाला शशांक केतकर?
 
मला पुन्हा एकदा फसवणाऱ्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला माझं काम झाल्यानंतर ठरलेले लाखो रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता अनेक महिने उलटून गेले आहेत. मी सतत पाठपुरावा करतोय, तरी या फसवणाऱ्या प्रोडक्शन हाऊसकडून मला प्रत्येकवेळी उडवा-उडवीची उत्तरं दिली जात आहेत. हा एक मराठी चित्रपट होता. इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय आणि मोठी नावं या चित्रपटात आहेत. त्यांना त्यांच्या कामाचे बऱ्यापैकी पैसे मिळाले आहेत. पण मी आणि याच टीममधल्या अनेकांना ठरलेल्या मानधनाच्या २० टक्केही रक्कम अजूनपर्यंत मिळाली नाही. याचे डिटेल्स आणि माझं आणि निर्मात्यांमध्ये झालेलं सभांषण मी लवकरच वेळ आली की मीडियासोबत शेअर करेन...असं शशांकनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शेवटी महत्वाचा प्रश्न उपस्थित करत तो असं म्हणाला आहे की, गमतीचा भाग हा असा आहे की एखाद्याकडे Acting skills नसतील तर त्याला आपण actor म्हणत नाही… मग ज्याच्या कडे पैसा नाही त्याला producer का म्हणतो."
 
 

shashank post 
अग्रलेख
जरुर वाचा
दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; 'या' तारखेला पाहायला मिळणार चित्रपट! जाणून घ्या

मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत; मात्र राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. या दमदार आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झालंय, ज्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळते. चित्रपटाचं नाव आणि रिलीझ झालेल्या टिझरवरून संपूर्ण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची ..