मुंबई : भारत सरकारच्या अणुउर्जा विभाग, आण्विक इंधन कॉम्पलेक्स अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. या विभागांतर्गत आयटीआय उमेदवारांना अॅप्रेंटिसशीपसाठी अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात 'आण्विक इंधन कॉम्प्लेक्स'कडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
दरम्यान, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. ३० सप्टेंबर २०२३ असणार आहे. तसेच, या भरतीच्या माध्यमातून फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, मशीनिस्ट, अटेन्डंट ऑपरेटर, प्रयोगशाला सहायक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, केमिकल प्लान्ट, ऑपरेटर मोटर मेकॅनिकल या पदासाठी प्रशिक्षण देण्यात येईल.