कार्यालयीन कामकाजात सर्व समावेशकता हीच औद्योगिक यशाची गुरुकिल्ली

नुकताच मुंबईत अवतार व सेरामाऊंट तर्फे " बेस्ट कंपनीज फॉर वूमन इन इंडिया व मोस्ट इन्कलुसिव्ह कंपनी इंडेक्स " चे सर्वेक्षण जाहीर

    15-Sep-2023
Total Views | 37
Survey
 
 
कार्यालयीन कामकाजात सर्व समावेशकता हीच औद्योगिक यशाची गुरुकिल्ली
 
 
नुकताच मुंबईत अवतार व सेरामाऊंट तर्फे ' बेस्ट कंपनीज फॉर वूमन इन इंडिया व मोस्ट इन्कलुसिव्ह कंपनी इंडेक्स ' चे सर्वेक्षण जाहीर
 
 
 
मोहित सोमण
 
 
भारतातील सामाजिक रचना गुंतागुंतीची आहे बहुआयामी कंगोरे असलेली आहे. परंतु नोकरदार वर्गात व कार्यालयीन स्थळी महिलांप्रती विषमता कमी होत चालल्याचे मान्यच करावे लागेल. समाज प्रबोधनातून या गोष्टी साध्य होतील. पण यालाही पूर्वनियोजित सुरक्षित कामाची चौकट दिल्याशिवाय आता गत्यंतर राहिले नाही. नोकरी व्यवसायात धर्म, पंथ, लिंग असत नाही असं म्हटल तरी वंचित असलेले सर्व घटक, महिला, दिव्यांग, LGBTQ, विशेष पात्रता असलेले सगळ्यांना ' सर्वसमावेशक ' वातावरण निर्माण करण्याची उद्योग विश्वात मागणी आहे. एकत्रित प्रयत्न केल्यास समान संधी प्रगती, सर्वांगीण विकास या गोष्टी साधल्या जातील. गेले अनेक वर्ष महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या भेदभाव, वातावरण यात गेल्या काही दिवसांत फरक पडला असून लिंग भेदाभेद कमी होतीये. उच्चपदस्थ जागेवर सुद्धा महिला मोठ्या संख्येने येऊ लागल्या आहेत. २००० आधी पुरूषांच्या तुलनेत सव्वा टक्के देखील संचालक, अध्यक्ष, मोठ्या पदी नव्हत्या त्यात आता लक्षणीय वाढ होत आहे. परंतु आजही काही गोष्टीत अजून सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.आजवर चांगल्या संधी निर्माण केलेल्या कंपन्यांचे कौतुक केल्याशिवाय हे प्रोत्साहन गहनपणे समाजात पोहोचणार नाही.
 
 
सर्वसमावेशक सहिष्णू मनुष्यबळाचा मुख्य फायदा म्हणजे तिथे एकी होते एक प्रकारचे मानवी मूल्य जपून एकमेकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शक्यता वाढते. मानवी जमात ही आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी ' अर्थ उद्योग ' हा मोठा पर्याय उपलब्ध आहे. काल मुंबईत Avtar व Seramount या कंपन्यांच्या संयुक्त विद्यमानाने ' बेस्ट कंपनीज फॉर वूमन' या स्पर्धेच्या बक्षीसाचे मानकरी व सर्व्हेचे निकाल जाहीर करण्यात आले. तब्बल १०० कंपन्यांनी यात मानाचे स्थान मिळवले. ५०० हून अधिक कर्मचारी संख्या असलेल्या व इतर विविध निकषांवर आधारित ३५४ कंपनीने या सर्वेक्षणासाठी नोंदणी केली होती. सद्यपरिस्थितीत स्त्रियांसाठी कामाची लवचिकता, प्रेरणा, उन्नतीसाठी असणारे पर्याय व मूलभूत सुविधा या सर्व्हेच्या निकषासाठी मापदंड ठरल्या. संशोधन, स्त्रियांचा कामकाजात धोरणात्मक बदल, गरजा, अडचणी सोडविण्यासाठी एच आर धोरणे यार हे सर्व्हक्षण अवंबले गेले. यातील कंपन्यानी दिलेली मुलभूत माहिती डेटा गोपनीय, व इनक्रिपडेट ठेवली असली तरी दिलेल्या माहितीचा आधारावर कामकाजासाठी सर्वोत्तम १०० कंपन्या व महिलांसाठी बेस्ट १० कंपन्या या प्रवर्गात पुरस्कार विभागला होता.
 
 
सर्वोत्तम कंपन्यांपैकी Accenture, Barclays, Citibank, DBS Bank, EY, IBM, Infosys, JSW Steel, P& G, Maersk India, Tech Mahindra आणि इतर कंपन्यांना हा सन्मान दिला गेला. २०२३ चे सर्व्हेक्षणात काही महत्वाची निरिक्षणे नोंदवण्यात आली. लिंगावर आधारित नोकर भरतीचे प्रमाण ३७.७ % वरुन २०२३ मध्ये ३८.६ % इतका झाला. लिंगावर आधारित समन्वय यावेळी वाढला असल्याचे निर्देशात आले‌. जवळपास ३.३८ लाख महिला कर्मचाऱ्यांची वाढ झाल्याने ' जेंडर' गुणोत्तरात १ टक्याची भर पडली. आयटी क्षेत्रात लैंगिक समानता हा निकष मनुष्यबळ भरतीत विचार केला असता या प्रवर्गात यंदा सुमारे २.०२ लाख स्त्री कर्मचाऱ्यांची भर पडली. कन्सल्टिंग क्षेत्रात ९४००० महिलांची भर पडली असल्याने आयटी क्षेत्रात महिलांसाठी कामाची स्थिती चांगली असल्याचे आढळून आले. उत्पादन क्षेत्रात २६०० स्त्री कर्मचाऱ्यांची वाढ होत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी १०००० संख्या महिला कर्मचाऱ्यांची नोंदविली गेली.
 
 
कंपन्या व एकूणच कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतो . २०१६ च्या २५ टक्यांच्या तुलनेत २०२३ मध्ये ३६ टक्यांपर्यंत वाढ झाली. मुख्य म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना कामात सोईस्कर हायब्रीड व लवचिकता आखणारी धोरणात्मक कंपनी म्हणून १०० कंपन्यांपैकी ९७ टक्के कंपन्या त्या प्रकारचे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत.सर्वोत्तम १० कंपन्यांपैकी महिलांचे ४१.७ टक्यांचे प्रतिनिधित्व या अहवालात सांगण्यात आले. उच्चपदस्थ महिलांची संख्या यंदा ३० टक्के असून समाधानकारक नसली तरी २०१६ चा १९ टक्यांच्या तुलनेत वाढलेली दिसली.
 
 
गेल्या अनेक वर्षांत समान वेतनाचा प्रश्न चर्चेत आला होता.याबाबत अहवालात म्हटल्याप्रमाणे ९२ टक्के कंपन्या या स्त्री पुरुष समानवेतनाला प्राध्यान्य देतात जो आकडा २०२२ ला ८६ टक्के होता.आजच्या घडीला सर्वांत मोठा मुद्दा ESG ( Environmental,Social, Governance) हा आहे.जगातील नवीन उद्योगधंद्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ' ई एस जी'. या क्षेत्रातील नियमनासाठी महत्वाचे नियम यातून तयार झाले आहेत. ESG मधील S म्हणजे सोशल. सामुहिक प्रयत्नातूनच हे उद्योगधंदे यशस्वी होणार असतील‌ तर ही रणनीती आखण्यात कंपनीनी सध्या नवी पाऊले उचलली आहेत.त्याच्या अहवालात ३१ टक्के कंपन्या या प्रकारचे नियमन अवलंबते आहे.
 
 
ज्यात समुपदेशन, प्रोत्साहन, शैक्षणिक अर्थसहाय्य, लवचिकता, कौशल्यविकास असे अनेक उपप्रकार यात आहेत.लैंगिक अल्पसंख्याक समाजाला देखील या कारभारात अंतर्भूत करण्यासाठी या अहवालात चाचपणी केली गेली.भारतातील महिलांसाठीच्या 100 सर्वोत्तम कंपन्यांचे वैशिष्ठ्य असे की, यातील 31% कंपन्या या मूळच्या भारतीय आहेत,तर इतर कंपन्या या मल्टीनॅशनल आहेत.
 
 
या आवृत्ती सोहळ्यात अनेक वास्तविक मुद्यांवर चर्चा झाली. सुलभीकरण, तंत्रज्ञानाचा वापर, समस्यांवर सुवर्णमध्य गाठणे, अपेक्षित गरजेला मात्रा देणे असे अनेक मुद्दे होते.कंपनीचे लक्ष, हेतू, कर्मचारी संख्या, उद्दिष्ट, समाजाची, व कर्मचाऱ्यांची गरज, महिला, लैंगिक अल्पसंख्याक सुरक्षा, अभ्यासपूर्ण वातावरण,समस्या या जाणून घेतल्यास आर्थिक विकासाला केवळ गती मिळणार नाही तर महिलांचे व संपूर्ण समाजाला बळ मिळेल.काळानुसार बदलणारे वातावरण, व व्यवसायात आकस्मिकता दाखवल्यास येणाऱ्या काळात ध्येयापासून सिदधीकडे पोहोचण्यास वेळ लागणार नाही .
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121