नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांनी कुआलालम्पुरमध्ये मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची भेट घेतली. दक्षिण कुआलालम्पुर येथील पुत्रजया येथील 'Bangunan Perdana Putra' इमारतीत पंतप्रधान कार्यालयात ही बैठक झाली. लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी चालवल्या जात असलेल्या योजनांचा सन्मान केल्याबद्दल अन्वर इब्राहिम यांनी सुपरस्टार रजनीकांत यांचे आभार मानले. अन्वर इब्राहिम म्हणाले की, आम्ही ज्या सामाजिक मुद्यांवर बोलतोय. त्यांच मुद्यांवर तुम्ही भाष्य केले.
सुपरस्टार रजनीकांतच्या पुढील चित्रपटांमध्ये या मुद्द्यांशी संबंधित गोष्टी दाखवल्या जातील, असे मलेशियाचे पंतप्रधान म्हणतात. मलेशियन मीडिया ऑर्गनायझेशन 'मलय मेल'ने आपल्या बातमीत लिहिले आहे की, रजनीकांत ज्यांना चाहते 'सुपरस्टार' म्हणतात ते 'मुथू' (1995), पदयाप्पा (1999), 'शिवाजी द बॉस' (2007) आणि यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले. 'एंथिरन द रोबोट' (2010) सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. मलेशियाचे पंतप्रधान आणि रजनीकांत यांनी एकमेकांना मिठी मारली आणि हस्तांदोलनही केले.
यावेळी इब्राहिम अन्वरने 'शिवाजी: द बॉस' या चित्रपटातील रजनीकांतच्या स्टाईलची ('टकलू बॉस' सीन)ची ही कॉपी केली. यानंतर दोघेही हसायला लागले. ते म्हणाले की, रजनीकांत हे आशियाई आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. रजनीकांत यांनी सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रात अग्रेसर राहावे, अशी प्रार्थना त्यांनी केली. दरम्यान मलेशियामध्ये 20 लाखांहून अधिक तमिळ लोक राहतात, जे तेथील लोकसंख्येच्या 6.7% आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या G20 च्या भव्य कार्यक्रमानंतर रजनीकांत आणि मलेशियाच्या पंतप्रधानांची ही भेट चर्चेचा विषय बनली आहे.
नुकताच प्रदर्शित झालेला सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटाने जगभरात 650 कोटींचा व्यवसाय केला आहे. यानंतर सन पिक्चर्सचे चेअरमन कलानिधी मारन यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना धनादेश दिला आणि एक कारही भेट दिली. रजनीकांत यांच्या १७१व्या चित्रपटाची (थलाईवर १७१) ची देखील दि. ११ सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली आहे, ज्याचे दिग्दर्शन लोकेश कनागराज करणार आहेत. 'कैथी', मास्टर आणि विक्रम यांसारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. ‘सन पिक्चर्स’ या चित्रपटाची निर्मितीही करणार आहे.