मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातील रिक्त जागांसाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली असून या अर्जप्रक्रियेस मुदत वाढ देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.
दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून एमटीडीसी मधील ‘विशेष कार्य अधिकारी आणि सल्लागार’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करावयाचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १८ सप्टेंबर २०२३ असणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे असून मुख्यालय : मफतलाल हाऊस, १ ला माळा, एच.टी.पारेख मार्ग, १६९, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई ४०००२०. भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.