मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लंडन दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत. तंत्रज्ञान आणि उद्योग संदर्भातली मुख्यमंत्री यांचीही महत्त्वाची लंडनवारी असणार आहे. हजारो कोटींचे उद्योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येताना परत आणणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री शिंदे बर्लिन, जर्मनी आणि लंडन दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. उद्योग, तंत्रज्ञानाशी संबंधित करार आणि तेथील मराठी भाषिक समुदायाशी संवाद असा दौऱ्यामागचा हेतू आहे.