मुंबई : चीनचे संरक्षणमंत्री ली शेंगफू बेपत्ता झाले असल्याचे बोलले जात आहे. 29 ऑगस्ट रोजी बीजिंगमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना शेवटचे बघितल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून ते बेपत्ता असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जपानमधील अमेरिकेचे राजदूत रेहम इमॅन्युएल यांनी एका पोस्टमध्ये चीनचे संरक्षणमंत्री ली शेंगफू बेपत्ता झाल्याचा दावा केला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून चीनचे संरक्षण मंत्री दिसत नसल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. याआधी जुलै महिन्यात चीनचे परराष्ट्रमंत्री शी जिनपिंग बेपत्ता झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
परंतू, यावर चीनकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. त्यानंतर आता संरक्षणमंत्री ली शेंगफू यांच्या बेपत्ता होण्यावरही चीनने मौन बाळगले आहे. मात्र, शी जिनपिंग यांच्यानंतर वांग यी यांना परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते.