मुंबई : स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) अंतर्गत विविध अनुवादक पदांसाठी अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून दि. २२ ऑगस्ट २०२३ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली असून दि. १२ सप्टेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आजच अर्ज करावा लागणार आहे.
दरम्यान, एसएससी अंतर्गत होणाऱ्या भरतीप्रक्रियेत कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदांसाठी ३०७ जागांसाठी कर्मचाऱ्यांची निवड होणार आहे. तसेच, उमेदवारांना अर्जात काही बदल करावयाचा असेल तर दि. १३ सप्टेबंर आणि १४ सप्टेंबर २०२३ रोजी बदल करता येणार आहे.
पुढील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
कनिष्ठ हिंदी अनुवादक: २१ पदे, कनिष्ठ अनुवाद अधिकारी: १३ पदे, कनिष्ठ अनुवादक: २६३ पदे, वरिष्ठ अनुवादक: ०१ पद, वरिष्ठ हिंदी अनुवादक: ०९ पदे भरली जाणार आहे.
एकंदरीत, या भरतीच्या माध्यमातून अनुवादक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी परीक्षा शुल्कात मागासवर्गीयांना सूट देण्यात आली आहे. तसेच, खुल्या प्रवर्गांसाठी १०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. भरतीविषयी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.