
IPO अपडेट्स - ' Zaggle Prepaid Ocean Services' कंपनीचा आयपीओ १४ सप्टेंबरला मार्केटमध्ये येणार
* १५६ ते १६४ रूपये प्रति शेअर्स दराने इक्विटी शेअर्स इश्यू करण्यात येतील.( या शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रत्येकी १ रुपये)
* IPO इक्विटी शेअर्सचा दर्शनी मूल्याच्या आधारावर Floor Price 156 वेळा असेल. Cap Price ही 164 वेळा असेल.
* ही ऑफर प्रारंभी 14 सप्टेंबरला चालू होणार असून 18 सप्टेंबरला संपेल.
* याचा व्यवहार कमीतकमी 90 इक्विटी शेअर्सचा होईल. त्यानंतरच्या व्यवहारात देखील 90 शेअर्सचा हिशोबाने होईल.
मुंबई: १४ सप्टेंबर २०२३ पासून Zaggle Prepaid Ocean Services Limited चा IPO १८ सप्टेंबर पर्यंत गुंतवणूकीसाठी मार्केट मध्ये खुला राहणार आहे. कंपनीने या IPO ( Initial Public Offer) ची घोषणा आज मुंबई येथे केली. हा कंपनीचा फ्रेश इश्यू असणार आहे.एकूण ३९२० मिलियन रुपयांचे हे इक्विटी शेअर्स असतील. त्यातील १०,४४९,८१६ किंमतीचे शेअर्स Offer for Sale (OFS) असणार आहेत.अँकर गुंतवणूकदारांसाठी ( Institutional Investors) साठी बिडिंग साठी तारीख १३ सप्टेंबर असणार आहे.Price Band हा १५६ ते १६४ रुपये प्रति शेअर्सच्या रुपात विक्रीसाठी उपलब्ध असेल.कमीतकमी ९० इक्विटी शेअर्स खरेदी करण्याची मर्यादा व मल्टीपल व्यवहारांसाठी किमान ९० शेअर्सचे व्यवहार करावे लागतील.
कंपनीने या गुंतवणूक उत्पन्नाच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळविण्यासाठी, व अस्तित्वात असलेले ग्राहक टिकवण्यासाठी होणाऱ्या खर्चासाठी हा निधी वापरला जाईल असे सांगितले आहे. तंत्रज्ञानाचा खर्च, व इतर मूलभूत खर्चासाठी ४०० मिलियन व पूर्वीची देणी याकरिता १७०.८३ मिलियन रुपयांची रक्कम यातून वापरली जाईल.राहिलेल्या पैशाचा २५ टक्यांपर्यंतची रक्कम ही कंपनीच्या कारभारासाठी वापरली जाईल.
Zaggle Prepaid Ocean Services ही भारतातील आघाडीची फिनटेक कंपनी आहे. २०११ साली या कंपनीची स्थापना झाली होती. आर्थिक व्यवहारांशी संबंधित, व्यावसायिक खर्चाचा लेखाजोखा, खर्चाचा हिशोब, व आर्थिक व्यवहारांसाठी संबंधित सॉफ्टवेअर फिनटेक व सास इंटिग्रेटेड कंपनी आहे.स्टार्टअप, नवीन व्यवसाय, छोटे उद्योजक व लघु मध्यम उद्योग यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांकरिता ही कंपनी सॉफ्टवेअर बनवते.कागदी हिशोब अचूक चटकन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा कंपनीचा मानस आहे.पेमेंट इकोसिस्टीम साठी B2B सेवा पुरविणाऱ्या Zaggle कंपनीला आगामी काळात मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा आहे.