"भारत हा असा देश आहे की..."; चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने गायले मोदींचे गोडवे!
11-Sep-2023
Total Views | 65
नवी दिल्ली : दोन दिवसीय जी-२० शिखर परिषदेचा रविवारी समारोप झाला. या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील प्रमुख नेते भारतात आले होते. त्यामुळेच भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेकडे जगाच्या नजरा खिळल्या होत्या. जगभरातील माध्यमांनी भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या जी-२० च्या बातम्यांकडे विशेष लक्ष दिले.
भारताविषयी कायम गरळ ओकणाऱ्या चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने सुद्धा जी-२० च्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले. त्यासोबतच पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या डॉनने सुद्धा जी-२० च्या बातम्यांना विशेष स्थान दिले.
चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने जी-२० शिखर परिषदेसंदर्भात प्रकाशित केलेल्या एका लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले. ग्लोबल टाईम्सने आपल्या लेखात लिहिले आहे की, "भारताने जी-२० शिखर परिषदेतून खुप काही मिळवलं. त्यासोबतच भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर स्वत:ला अधिक मजबूत बनवले आहे. भारत एक असा देश आहे, ज्याला अमेरिका आणि रशिया दोघेही पाठिंबा देतात."