गणेशोत्सवाआधी कोकण रेल्वे स्थानकांचं रुपडं पालटणार: फडणवीस

    08-Aug-2023
Total Views | 84
 
Devendra Fadnavis
 
 
मुंबई : गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी मोठा सण असतो. त्यामुळे गणपतीआधी कोकण रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरणाचं काम करण्याचा प्रयत्न करू. गणपतीआधी हे काम होतंय ही महत्त्वाची गोष्ट आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेची 12 रेल्वेस्थानकं आणि परिसराचं सुशोभीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी (८ ऑगस्ट) ऑनलाइन करण्यात आलं.
 
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, "कोकण हा पर्यटकांच मन मोहून घेणारा परिसर आहे. कोकणाच्या विकासासाठी सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोकणची लाईफलाईन असलेली कोकण रेल्वेच्या स्थानकांचा कायापालट होणे गरजेचे आहे. आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला. गणपतीच्या आधी हे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी मोठा सण आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात लोकं कोकणात जात असतात."
 
"या वर्षीच्या अर्थसंकल्पातही कोकणासाठी अनेक प्रकल्प मांडले. स्टेशन परिसरात रस्त्याचं काँक्रीटकरण, प्रकाश दिवे, पेव्हड शोल्डर, स्वच्छतागृह, स्टेशन प्लाझा, प्रतिक्षालयांचं सुशोभिकरण होणार आहे. कोकण रेल्वेच्या १२ स्टेशनच्या सुशोभिकरणासाठी ५६.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे." अशी माहिती फडणवीसांनी दिली.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121