ज्ञानवापी सर्वेक्षणात हिंदू धर्मस्थळाची अनेक चिन्हे आणि देवनागरी लिपी सापडल्याचा दावा!

    07-Aug-2023
Total Views | 96
Gyanvapi survey update

लखनऊ : वाराणसीच्या ज्ञानवापी सर्वेक्षणात दि. ६ ऑगस्टपासून सुरू आहे.त्याचवेळी ज्ञानवापीत हिंदू पक्षकारांनी खंडित मूर्ती, तुटलेले खांब, खंडित कलाकृती, त्रिशूल आणि कलशाची अनेक चिन्हे इत्यादी आढळल्याचा दावा केला आहे. मात्र, एका इमामने हा दावा फेटाळून लावला आहे.

या सर्वेक्षणासंदर्भात अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच ज्ञानवापी परिसरात देवनागरी लिपीही आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात काय लिहिले आहे हे फक्त लिपी तज्ञ्ज्ञ सांगू शकतात. याशिवाय अर्धे प्राणी आणि अर्धे मानवाचे चिन्ह सापडले असून, ती नरसिंहाची मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने (एएसआय) या छायाचित्रांना अधिकृत पुष्टी ही दिलेली नाही किंवा ते नाकारली ही नाही. त्याचवेळी, दि. ६ ऑगस्टपासून ज्ञानवापीच्या तळघराची स्वच्छता केली जात आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिंदू पक्षाची फिर्यादी सीता साहू आणि त्यांचे वकील सुधीर त्रिपाठी यांनी दावा केला आहे की, एएसआयच्या वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे केलेल्या तपासामुळे हे स्पष्ट होईल की, ज्ञानवापीच्या मुख्य घुमटाखाली शिवलिंग जमिनीखाली गाडले गेले आहे. यामध्ये ASI टीम आयआयटी कानपूरची मदत घेणार आहे. यासाठी ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
 
हिंदू पक्षाची मुख्य वकील राखी सिंग आणि तिचे वकील अनुपम द्विवेदी यांनी सांगितले की ASI टीमने दि. ५ ऑगस्ट रोजी ज्ञानवापीच्या विद्यमान इमारतीचे 3-डी इमेजिंग केले. इमारतीच्या 3-डी इमेजिंगसाठी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) ची मदत घेण्यात आली.
 
याशिवाय, ज्ञानवापीच्या आतील भागाचे मॅपिंग आणि स्कॅनिंग तसेच छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी सुरू आहे. तपासात कोणतेही रसायन वापरलेले नाही, उत्खननही झालेले नाही. ASI टीम ज्ञानवापीच्या बाहेर आणि आत प्रत्येक कोपरा पाहून अभ्यासासाठी पुरावे गोळा करत आहे.
 
दुसरीकडे, ज्ञानवापीचे मुख्य इमाम मुफ्ती अब्दुल बतीन नोमानी म्हणतात की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो ज्ञानवापीचे नाहीत. नोमानी म्हणाले की, ज्ञानवापी ही मशीद होती आणि राहील. ते म्हणाले की, मुस्लिम दर शुक्रवारी तेथे नमाज अदा करण्यासाठी जातात. त्याना तिथे अशा कोणत्याही खुणा दिसल्या नाहीत.


 
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समजून घेणे आवश्यक!, रा.स्व.संघाबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समजून घेणे आवश्यक!, रा.स्व.संघाबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी?

( Narendra Modi work of the Rashtriya Swayamsevak Sangh ) “बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकींना उपस्थित राहणे माझ्यासाठी आनंददायी होते. आपण देशासाठी समर्पित जीवन जगावे, हे मला रा. स्व. संघाने शिकवले. यावर्षी 100 वर्षे पूर्ण करणार्‍या रा. स्व. संघापेक्षा जगात अन्य दुसरा मोठा स्वयंसेवी संघ नाही.‘आरएसएस’ समजून घेणे सोपे काम नाही, त्याचे कार्य समजून घेणे आवश्यक आहे,” अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत ..