रशिया-युक्रेन संघर्षावर भारत काढणार तोडगा?; अजित डोवाल यांचे प्रतिपादन
06-Aug-2023
Total Views | 69
नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरु असून यात मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी होत आहे. या संघर्षावर भारत तोडगा काढेल असा विश्वास भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळं युक्रेनमधील अनेक प्रमुख शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, डोवाल यांचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
युक्रेनमधील संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या उद्देशानं सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात दोन दिवसीय परिषदेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल उपस्थित होते. त्यांच्यासह इतर अनेक देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही या परिषदेत सहभागी झाले होते. त्यानिमित्त डोवाल यांनी हे विधान केले आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या परिषदेचं आयोजन केलं होतं. सुमारे ४० देशांचे उच्च सुरक्षा अधिकारी यात सहभागी झाले होते.