बॉडी बॅग खरेदी घोटाळ्यानंतर आता खिचडी घोटाळा; वाचा सविस्तर!
06-Aug-2023
Total Views | 375
मुंबई : कोवि़ड काळात झालेले घोटाळा आता उघड होत आहेत. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोविड काळातील उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी केलेल्या खिचडी घोटाळ्याची तक्रार केली आहे. किरीट सोमय्या यांनी ही तक्रार पोलिस, ईडी, आयकर, बीएमसीकडे केल्याची माहिती आहे. लॉकडाऊन दरम्यान कामगार आणि गरीब लोकांना खिचडीचे वाटप केले जात होते. त्यात ही घोटाळा झाल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या नंतर खिचडी घोटाळ्यात कोणावर गुन्हा दाखल होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
दरम्यान कोविड सेंटर घोटाळ्याबाबत किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलिस ठाण्यात पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. या संपूर्ण प्रकारणावर आता भाजपा नेते किरीट सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, "किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार. मुंबईच्या महापौर, अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधिची तक्रार मुंबई पोलिसात केली होती. आणखी तीन घोटाळ्यांचा तपास सुरु आहे. यावरही कारवाई होणार आहे. आधी संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर जेलमध्ये गेले होते, आता किशोरी पेडणेकर आणि नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार." असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.