‘बागेश्री’ ओडिशातील बांधवांच्या भेटीला; ‘गुहा’ केरळ किनाऱ्याजवळ

    05-Aug-2023   
Total Views | 266



Bageshri Guha update


मुंबई (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरीत टॅग केलेले बागेश्री या कासवाने आता बंगालच्या उपसागरात प्रवेश केला आहे. तर, गुहाशी दि. २३ जूलै पासुन तुटलेला संपर्क आता पुन्हा मिळु लागला असुन ती केरळच्या कन्नुर किनाऱ्यापासुन अवघ्या ९० किलोमिटरच्या अंतरावर आहे. गुहाशी सॅटेलाईट ट्रान्समीटरचा तुटलेला संपर्क आता पुन्हा मिळू लागल्यामुळे ऑलिव्ह रिडले कासवांच्या या सफरीने पुन्हा आकर्षक वळण घेतले आहे.

जवळजवळ गेले दहा दिवस सॅटेलाईट ट्रान्समीटर न देणारी गुहा आता पुन्हा सॅटेलाईट ट्रान्समीटरचे संकेत देऊ लागली आहे. ट्रान्समीटर काही तांत्रिक समस्यांमुळे बंद झाला असावा अशी शक्याता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गुहा कासवीणीशी संपर्क तुटला होता मात्र आता ती पुन्हा संकेत देत असुन ती केरळचे कन्नुर शहर जवळ करते आहे. “सॅटेलाईट ट्रान्समीटर हे चाचणी केलेलं असलं तरी शेवटी ते यंत्र आहे. समुद्रातील खारं पाणी आणि तेथील वातावरण बऱ्यापैकी कठोर असल्यामुळे त्याचा यंत्रावर परिणाम होऊन ते खराब झाले असल्याची शक्यता आहे. पण, आता सिग्नल्स पुन्हा मिळत आहेत. यंत्र पुन्हा खराब होऊ नये अशी आशा आहे”, अशी माहिती वाइल्डलाईफ इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ आर सुरेश कुमार यांनी दिली आहे.

तर, दुसरीकडे रत्नागिरीहुन थेट श्रीलंकेला पोहोचलेल्या बागेश्रीची सफर अद्भुत आणि आश्चर्यचकित करणारी राहिली आहे. ती आता श्रीलंकेच्या पुर्व किनाऱ्यावरील बट्टीकालोआ किनाऱ्यापासुन ४०० किलोमिटर अंतरावर आहे. बंगालच्या उपसागरात पोहोचलेल्या बागेश्रीचे ठिकाण अधिक मनोरंजक असणार आहे कारण, ओडिशाच्या किनाऱ्यावरील कासवे वीणीच्या हंगामानंतर स्थालांतरासाठी येतात. दोन वेगळ्या किनाऱ्यांवरील कासवे येथे एकत्र येऊन भेटत असल्यामुळे हे मनोरंजक ठरणार आहे.


काय आहे सॅटेलाईट टॅगींग?


रत्नागिरीतील गुहागरच्या किनारी टॅग केलेली बागेश्री आणि गुहा या मादी कासवीणींची जोडी चांगलीच चर्चेत आहे. सॅटेलाईट टॅगद्वारे त्यांच्या समुद्र सफरीवर आता अवघ्या भारताचेच लक्ष लागले आहे. वीणीच्या हंगामात कोकणातील काही ठराविक किनाऱ्यांवर येणाऱ्या या ऑलिव्ह रिडले कासवांविषयी समुद्री जीव असल्यामुळे फारशी माहिती नव्हती. हिच माहिती मिळवता यावी यासाठी फेब्रुवारीमध्ये या कासवांना सॅटेलाईट टॅगींग करण्यात आले आहे. महाराष्ट्र कांदळवन कक्ष, वाईल्डलाईफ इंस्टीस्यूट ऑफ इंडिया यांच्या समन्वयाने या दोन कासवांना सॅटेलाईट टॅग लावण्यात आले आहे.
“या दोन कासवांच्या हालचाली पाहता आपण दोन वेगळ्या प्रदेशातील कासवांशी संपर्कात आहोत हे स्पष्ट होत आहे. एकाच किनाऱ्यावर टॅग केलेले मात्र दोघींचेही वागणे आणि हालचाली पुर्ण वेगळ्या असलेल्या पहायला मिळत आहेत. गुहा अरबी समुद्रातच फिरत राहिलेली दिसत आहे तर, बागेश्रीने मात्र सराईतपणे श्रीलंका ही ओलांडत ती इतर किनाऱ्यांची खोरी फिरत आहे.”

- आर. सुरेश कुमार
वरिष्ठ शास्त्रज्ञ,
संकटग्रस्त प्रजाती व्यवस्थापन विभाग
 वाइल्डलाईफ इंस्टीट्युट ऑफ इंडिया 

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा
IPL सामना अनपेक्षितपणे रद्द; प्रिटी झिंटाकडून चाहत्यांची माफी धर्मशाळा स्टेडियममध्ये काय घडलं?

IPL सामना अनपेक्षितपणे रद्द; प्रिटी झिंटाकडून चाहत्यांची माफी धर्मशाळा स्टेडियममध्ये काय घडलं?

हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील HPCA (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन) स्टेडियममध्ये गुरुवारी एक अनपेक्षित घटना घडली. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला IPL सामना अवघ्या 10.1 षटकांतच अचानक थांबवण्यात आला. यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेले हजारो प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या सगळ्या परिस्थितीत अभिनेता आणि पंजाब किंग्जची सह-मालक प्रिटी झिंटा हिने मोठ्या संयमाने आणि जबाबदारीने परिस्थिती हाताळली. यानंतर तिने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून आपल्या..

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121