निवृत्तीपूर्वीचे काटेकोर आर्थिक नियोजन

    31-Aug-2023
Total Views | 42
financial planning before retirement

निवृत्त होताना किंवा त्यानंतर कर्ज काढू नये

चांगल्या अपेक्षेने कर्ज काढले तरी त्याचा हप्ता उतारवयात फेडणे हे कठीण जाते. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी उतारवयात कर्जाच्या भानगडीत न पडलेले उत्तम. अर्थात, विशिष्ट वयानंतर बँका कर्ज देत नसल्या तरी अलीकडे आलेल्या खासगी आर्थिक संस्थांची लाट पाहता ज्येष्ठ नागरिकांनी यापासून सावध राहायला हवे.

निवृत्तीनंतरच्या जीवनाचे पूर्वनियोजन

मराठीत एक म्हण आहे की, जेवायचे ताट दिले तरी बसायचा पाट देऊ नये. याचाचा अर्थ आपल्या आप्तेष्टांना आर्थिक मदत, मुलांचे पालनपोषण, इतर खर्च हे पकडूनसुद्धा स्वतःच्या भविष्यासाठी मात्र आर्थिक तरतूद प्रत्येकाने करून ठेवलीच पाहिजे. जेणेकरून भविष्यात कोणासमोरही हात पसरावे लागणार नाहीत. स्वतःच्याभविष्यातील आरोग्य समस्या, अनपेक्षित खर्च यासाठी प्रारंभीपासूनच पैशाची बचत केल्यास ऐनवेळी आर्थिक संकट टळू शकते.

गुंतवणुकीसाठी योग्य सल्ला

एखादी गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीचा सल्ला गुणकारी ठरतो. चुकीचे मार्गदर्शन संकटाच्या खाईत लोटत असते. गुंतवणूक करताना कंपनी कुठली, तिचे भवितव्य, कामगिरी, मार्केटमधील परिस्थिती, इतर बारकावे यासंदर्भात नीट माहिती घेणे आवश्यक असते. सल्ला देताना त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय, या सगळ्याचा नीट विचार करावा.

योग्य गुंतवणूक

एकदा गुंतवणूक करायचे ठरवल्यास तरुण वयातच त्याचा प्रारंभा करायला हवा. जमाखर्चाचा जुजबी अंदाज घेत त्याचे आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात त्याचा निश्चितच फायदा होईल. इक्विटी, फिक्स डिपॉझिटवरील रिटर्न्स यांचा अभ्यास आपल्या नेमक्या गरजेनुसार करावा. इक्विटी इनव्हेसमेंट रिटर्न्स चांगले देते, पण बेभरवशी मार्केटमध्ये या प्रकारात ‘रिस्क’ पण जास्त असते. दुसरीकडे म्युच्युअल फंड, फिक्स डिपॉझिट अशा ठिकाणीदेखील गुंतवणूक केल्यास तुलनेने ‘रिस्क’ कमी असते व त्या गुंतवणुकीवरील परतावा मर्यादित असला तरी त्यावरही फायदा होतोच. तुमचे नियोजन हे या गोष्टीवर केल्यास ’Calculated Risk’ घेण्याची सवय होते.

इतर स्क्रूटिनी आणि आर्थिक ताळेबंदीपासून सावध राहावे
 
या सगळ्याचा विचार करतानाच, टॅक्स वेळेवर भरण्याकरिता योग्य नियोजन करायला हवे. यामुळे जमाखर्चाच्या योग्य नियोजनातून टॅक्स आणि इतर तरतुदीतून योग्य निष्कर्ष काढला जाऊ शकतो.याखेरीज कमी वयात नियोजन करताना भविष्य व वर्तमानातील विचारच लवकर केल्यास लक्ष्य गाठणे सोपे होईल. याखेरीज मार्केटमध्ये पैसे गुंतवताना घाई व अतिआत्मविश्वास टाळावा. शांत डोक्याने गुंतवणुकीसाठी पाऊल ठेवल्यास चुकण्याची शक्यता कमी होते. शेवटी तुमची जमापुंजी तुमचा खजिना आहे. आर्थिक नियोजन विद्यार्थीदशेतच केल्यास परिणामी साखरेचा आपण आस्वाद भविष्यात घेऊ शकता.


(प्रतिनिधी)


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121