मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नोकरीची संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे. राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांसाठी ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत रिक्त पदांची भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून ‘IFC ब्लॉक अँकर’ पदांच्या एकूण ०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०२३ असणार आहे.
तसेच, उमेदवारास अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रत पुढील पत्तावर पाठवायची आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, आरमोरी जि. गडचिरोली. ई-मेल पत्ता – bmmu.armori@gmail.com.
तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, धानोरा जि. गडचिरोली. ई-मेल पत्ता – bmmudhanora@gmail.com
तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, कुरखेडा जि. गडचिरोली. ई-मेल पत्ता – bmmukurkheda2014@gmail.com
तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाचे खाली, गडचिरोली जि. गडचिरोली. ई-मेल पत्ता – bmmugadchiroli@gmail.com
शैक्षणिक पात्रता
कृषि पदवी (B.sc Agri) किंवा B.sc in Horticulture, किंवा B.Tech.in Agriculture, किंवा फिशरीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स, फॉरेस्ट्रीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि बॅचलर ऑफ सायन्स इन अॅनिमल हस्बंडरी, किंवा बीबीए.