
अदानी प्रकरणाला नाट्यमय वळण? ईडीने सेबीकडे सुरू केली मोर्चेबांधणी - सुत्र
मुंबई : ' टाईम्स ऑफ इंडिया ' ला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अदानी यांच्यावरील 'Stock Manipulation' वर आधारित गुप्त अहवाल ईडीने सेबीकडे सुपूर्त केला आहे. त्यातील माहितीनुसार, फॉरेन पोर्टफोलिओ इनव्हेसटर्स (FPI's) सगट खाजगी क्षेत्रातील भारतीय बँकांच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी हा रिपोर्ट असल्याचे समजते आहे. टाईम्स ऑफ इंडियाचा बातमीनुसार या १५ ते १६ संस्थांशी निगडित व्यवहारांचा लेखाजोखा सेबीकडे पाठवण्यात आला. ईडीकडे PMLA ( Prevention of Money Laundering) या गुन्ह्याखाली कारवाई करण्याचा अधिकार नसला तरी अनैतिक व्यवहार घोटाळा, आर्थिक गैरव्यवहारांसंबंधी फौजदारी गुन्हा नोंदवण्याचा अधिकार त्यांच्या कार्यकक्षेत बसतो.
कथित अदानी शेअर्स गैरव्यवहार प्रकरणात हिंडनबर्गने जानेवारी मध्ये आरोप करण्यापूर्वीच नोव्हेंबर २२ मध्येच या संस्थांनी शोर्टसेलिंग घडवले असल्याचा उल्लेख यामध्ये केला गेला आहे. यातील बहुतांश संस्था यांनी अदानी इंटरप्राईजेस समुहाशी व्यवहार यापूर्वी केले नाहीत असे म्हटले जात आहे.
त्यामुळेच उद्योग जगतात या प्रकरणाने घेतलेले वळण पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.