ज्ञानवापीचे सर्वेक्षण होणारच! अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय; मुस्लिम पक्षाला मोठा धक्का
03-Aug-2023
Total Views | 70
लखनऊ : ज्ञानवापी कॅम्पसच्या एएसआय सर्वेक्षणावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या निर्णयानंतर आता ज्ञानवापी कॅम्पसचे एएसआय सर्वेक्षण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकतीच एएसआयच्या सर्वेक्षणाला स्थगिती दिली होती.
वास्तविक, वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कुमार विश्वेश यांनी ज्ञानवापी सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. आता उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. अशाप्रकारे ज्ञानवापी कॅम्पसच्या एएसआय सर्वेक्षणावरील बंदीही हटवण्यात आली आहे.
आता एएआयकडून सर्वेक्षणाचे काम केव्हाही सुरू केले जाऊ शकते. त्याचबरोबर मुस्लिम बाजूने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. लवकरच मुस्लिम पक्ष एएसआय सर्वेक्षण थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकते, असे मानले जात आहे.