मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकरांना दिलासा मिळालेला नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली होती. अटकेपासून संरक्षणाची विनंती केली होती.
किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीने किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यातच किशोरी पेडणेकर यांना २९ ऑग. अटकेपासुन दिलासा मिळाला होता. मात्र, आता किशोरी पेडणेकरांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.