पालघरमध्ये आढळले बारा किलोचे भुईछत्र; भारतातील पहिलीच नोंद

    29-Aug-2023
Total Views | 922
fungi
 

मुंबई (अक्षय मांडवकर) - निरनिराळे आकार, आकर्षक रंग आणि मुख्यत: पावसाळ्यात उगवणाऱ्या बुरशींमधील ( fungus ) एक आगळीवेगळी प्रजात पालघर जिल्ह्यात आढळून आली आहे. जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्याला तब्बल बारा किलो वजनाची 'मॅक्रोसायब' या कुळातील अळंबी ( fungus ) सापडली. महत्त्वाचे म्हणजे भारतामधून प्रथमच या कुळातील आकार आणि वजनाने एवढ्या मोठ्या अळंबीची ( fungus ) नोंद करण्यात आली आहे.

 
पावसाळ्यात बुरशीच्या अनेक प्रजाती उगवतात. पसरट, चेंडूसारख्या, बॅडमिंटन खेळातील फुलासारख्या, छत्रीसारख्या आणि चांदणीच्या आकारासारख्या विविधढंगी बुरशी या हंगामात पाहायला मिळतात. छत्रीच्या आकारासारख्या बुरशींना भुईछत्र म्हटलं जात. यामधील बुरशीच्या प्रजाती या खाण्यासाठी वापरल्या जातात. त्यांना स्थानिक भाषेत रोवणं, कावळी अशा वेगेवगेळ्या नावाने संबोधतात. याच भुईछत्रामधील दीड फूट उंच आणि बारा किलो वजनाचे भुईछत्र मोखाडा तालुक्यातील सायदे गावात आढळून आले आहे. शनिवार, दि. २६ आॅगस्ट रोजी गावातील रहिवासी भास्कर झुगरे यांना हे भुईछत्र त्यांच्या शेतातील झाडावर आढळून आले.




हे भुईछत्र 'मॅक्रोसायब' या कुळातील आहे. या कुळातील बुरशींना 'जायन्ट हेड' या नावाने ओळखले जाते. कारण, या भुईछत्रामधील छत हे रुंदीला जवळपास १०० सेंमी म्हणजे ३ फुटांचे असते. तर हे भुईछत्र दीड फुटांपर्यंत उंच वाढते. बुरशीची ही प्रजात प्रमुख्याने एकाच ठिकाणी एका पेक्षा अधिक संख्येने आढळते. जगात 'मॅक्रोसायब' या कुळातील सात प्रजाती आढळतात. सायदे गावात आढळलेल्या 'मॅक्रोसायब' कुळातील भुईछत्राच्या प्रजातीची नेमकी ओळख पटलेली नाही. संशोधकांनी त्या भुईछत्राचे नमुने तपासल्यानंतरच तिच्या नेमक्या प्रजातीची ओळख पटेल.
'ऍगारिकॅलीस' आॅडरमधील 'मॅक्रोसायब' या कुळातील आकार आणि वजनाने एवढ्या मोठ्या असणाऱ्या बुरशीची ही भारतामधील पहिलीच नोंद आहे. या बुरशी त्यांच्या छताच्या आकारासाठी ओळखल्या जातात. आफ्रिका आणि अमेरिकेमध्ये त्यांची शेती करुन त्या खाण्यासाठी वापरल्या जातात. मोखाड्यात सापडलेल्या 'मॅक्रोसायब' कुळातील या बुरशीच्या नेमक्या प्रजातीची ओळख पटवण्यासाठी तिचे नमुने आवश्यक आहेत. शिवाय त्याठिकाणी या प्रकारचे भुईछत्र उगवलेले आहेत का, हे देखील तपासणे गरजेचे आहे.

- डाॅ. पांडुरंग बागम, बुरशी संशोधक
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121