मुंबई : १० वी आणि १२ वी उत्तीर्णांसाठी 'एयरपोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून १०वी, १२ वी उत्तीर्णांना सरकारी नोकरी करण्याची नामी संधी चालून आली आहे. दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरणात कनिष्ठ कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक पदांसाठी ११, ३४२ जागा रिक्त असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी अर्जासाठी अधिकृत वेबसाईट aai.aero ला भेट द्या.
दरम्यान, या अर्जासाठी करण्याची अंतिम मुदत ०८ सप्टेंबर २०२३ असून जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी उमेदवारांकडून १ हजार रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. तर मागासवर्गीय आणि महिला उमेदवारांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाहीये. तसेच, उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षेदरम्यान असावे.