मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता दहावीची परिक्षा १ मार्च २०२४ ते २२ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे. तर इयत्ता बारावीची परिक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ या दरम्यान होणार आहे.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी सविस्तर वेळापत्रक https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाऊन पाहावे. हे वेळापत्रक संभाव्य असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.