जिल्हा परिषद भरती २०२३ : १९,४६० जागांसाठी १४ लाखांहून अधिक अर्ज

    27-Aug-2023
Total Views | 40
Zilla Parishad Recruitment 14 Lakh Applications

मुंबई :
राज्य शासनाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात आले होते. 'क' गटाच्या विविध संवर्गातील १९,४६० रिक्त जागांसाठी १४ लाखांहून अधिक अर्ज शासनाला प्राप्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत आलेल्या अर्जांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत १४५ कोटींची भर पडली आहे. या भरतीसाठी खुला वर्गासाठी परीक्षा शुल्क १,००० रुपये तर राखीव वर्गासाठी ९०० रुपये आकारण्यात आले.

दरम्यान, राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार ४६० पदांची नोकरभरती होणार असून त्यासाठी तब्बल ४१ लाख ५१ हजार उमेदवारांनी अर्ज केले असून एका जागेसाठी सरासरी ७५ उमेदवार स्पर्धेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त फडणवीस-शिंदे सरकारने शासकीय विभागांमधील ७५ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू असून आता जिल्हा परिषदांमधील रिक्तपदांसाठी अर्ज मागविले आहेत. ५ ते २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती.





 
अग्रलेख
जरुर वाचा
दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; 'या' तारखेला पाहायला मिळणार चित्रपट! जाणून घ्या

मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत; मात्र राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. या दमदार आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झालंय, ज्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळते. चित्रपटाचं नाव आणि रिलीझ झालेल्या टिझरवरून संपूर्ण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची ..