मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती.
दरम्यान, विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पध्दतीने पाहता येणार आहे. निकाल दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येईल. तसेच, दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.