Explainer Scam 2003 : एका रात्रीत तरनूम खान बारडान्सरवर ९० लाख उडवणारा कोण होता तेलगी?
२००३ साली मुद्रांक घोटाळ्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत हादरे बसले. बनावट मुद्रांक पेपर केसमध्ये अब्दुल करीम तेलगी याला बंगलोर येथे अटक करण्यात आली. याने त्यांचे पाठीराखेच नाही पोलीस, मंत्री, प्रशासन यांच्यातील 'कर्ता धर्ता ' व्यथित झाले. १९९६ ते २००३ या काळात जवळपास ३०० बिलियन डॉलरचा घोटाळा केला. तेलगीचे साथीदार आणि स्वतः तेलगी यांना गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून ३० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी तेलगीला न्यायालयाकडून २०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
कोण होता तेलगी?
अब्दुल करीम तेलगी हा कर्नाटकतील तरूण पैसे कमावण्यासाठी मुंबईत आला. वडील लवकर वारल्यानंतर त्याने याआधी छोटे मोठे उद्योग केले होते. परंतु पैशाची चटक भल्याभल्यांनाही लागली तर जन्मभर सुटत नाही त्यातलाच हा प्रकार. मुंबईतील मरीन लाईन्स तेथे एक रिक्रुटमेंट एजंट ट्रॅव्हल कंपनी सुरू केली. त्यानंतर हळूहळू ओढा पैश्याकडे गेल्यावर बनावट नोटा बनवण्यास त्याने सुरूवात केली. हजरजबाबी आणि बोलण्याच्या भुरळ घालण्याचा पद्धतीने त्याची मैत्री नाशिकच्या सरकारी प्रिंटिंग प्रेस मधील काही कर्मचाऱ्यांशी ओळख झाली. सुरूवातीला ही कंपनी चालवत असताना एका फसवणूकीचा केसमध्ये आर्थर रोड तुरुंगात रजत सोनी नामक बदमाशशी ओळख झाली. हळूहळू छोटे मोठे नकली पासपोर्ट, नकली नोटा असे घोटाळे करत असताना सोनीचा सल्याने देशात स्टँपेपरची त्रुटी असल्याने तो धंदा करावा असा सल्ला दिला गेला.
त्यामुळे हळूहळू नाशिक प्रेस प्रिंटिंग मशीन लिलावातील जुने मशीन खरेदी करत छापण्याची टेक्निक जाणून पुढे मुद्रांक छापण्यास सुरूवात केली. अनेक मोठमोठ्या कंपन्यांना ( सरकारी कंपन्यासहीत)सप्लायर म्हणून काम करत मुद्रांक पेपर विक्री केली. रोजच्या वापरातील ५,१०,१००,५० अशा रूपयांच्या असली स्टँप बरोबर नकली स्टँप मिश्रण करत त्याची देवाणघेवाण सगळीकडे होऊ लागली.
या घोटाळ्यामुळे पूर्ण भारतात नकली स्टँपचे वितरण झाल्याने तेलगीला प्रचंड पैसे मिळाले. कष्टाचा कामात न टिकू शकलेला तेलगी झटपट पैशासाठी प्रयत्न करत होता. करोडो रुपये कमावत असताना तेलगीला विलासी जीवनाची सवय झाली. परिणामी अय्याशी करणे, डान्सबार जाणे अशा सवयीनी तो अजून प्रसिद्धचा झोतात आला. अस म्हणतात, मुंबईतील सर्वात मोठी स्टार बारडान्सर तरनूम खान या तथाकथित नंबर १ प्रसिद्ध बारडान्सर वर ग्रँट रोड येथील तत्कालीन टोपाज बारमध्ये नाचगाण्यात एका रात्रीत ९० लाख रुपये उडवले.
हळूहळू वाममार्गाचा पैसा उघडकीस येतोच तसंच झाल. एकदा एका हुशार माणसाने असली नकली मधला फरक लक्षात घेता आपल्याला बनावट मुद्रांक मिळाल्या प्रकरणी तेलगी विरूद्ध तक्रार नोंदवली. हळूहळू तपास करताना बंगलोर पोलिसांना हे प्रकरण मोठे आहे हे लक्षात आल्यावर मुंबईतील स्पेशल सेलकडे ही केस वर्ग झाली. हळूहळू सगळी माहिती घेतल्यावर सरकारला ही घामटा फुटला. अखेर खबरी लोकांच्या टीपवर त्याला कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक वर्ष चाललेल्या केसमध्ये त्याला अखेर ३० वर्षांची शिक्षा २०२ कोटींचा दंड न्यायालयाने ठोठावला.
त्यावेळी समाजात अशीही चर्चा चालू होती की यात अनेक मोठे मासे गळाला लागतील. परंतु अचानक तेलगीला एड्स असल्याची अफवा पद्धतशीर पसरल्याने पोलिसांनी त्याला थर्ड डिग्रीचा प्रयोग केला नाही. याचा फायदा तेलगीने पुरेपूर घेतला. या केसमध्ये केस दाबण्यासाठी अनेक पोलीस सहकारी कामात रोखत असल्याचे पोलिस अधिकारी एस एम मुश्रीफ यांनी सरकारला पत्र लिहिल्याने यांची उच्चस्तरीय चौकशी देखील झाली. १२-१३ पोलिसांना सस्पेंड करून त्यांच्यावर खटला दाखल झाला. नंतर काही निर्दोष सुटले तरी काही खटले आताही प्रलंबित आहेत.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तत्कालीन समाजवादी जनता पक्षाचे आमदार अनिल गोटे यांच्याशी तेलगीने ओळख करून मस्का लावून मुद्रांक लायसन्स प्राप्त केले . अत्यंत दुर्मिळ लायसन्स मिळवल्यानंतर त्याचा गैरवापर तेलगीने नकली मुदांक बनवून केला.
अखेर अंत
२०१७ मध्ये डायबिटीस, इतर व्याधींवर उपचार घेत असताना इस्पितळात तेलगीला मृत्यू झाला. तेलगीचा पत्नीने हा पैसा हराम असल्याने सरकारने जप्त करण्यात यावा किंवा लिलाव करावा अशी मागणी कोर्टात केली. अब्दुल करीम तेलगी हा तत्कालीन वर्तमानपत्राचे हेडलाईन्स झाल्यावरच या व्यक्तीची तुफान चर्चा तेव्हा झाली. तेलगीचा आयुष्यावर व त्याने केलेल्या आर्थिक गुन्ह्यांवर आता Sony Liv वर Scam 2003 ही वेब सिरीज लवकर येत असल्याचे समजत आहे.