‘सहा फुटाचे एकमेव स्पॉटलेस बाळ’

    24-Aug-2023   
Total Views |
spotless giraffe



मुंबई (विशेष प्रतिनिधी):
अमेरिकेतील टेनिसमध्ये जगातील एकमेव अशा ठिपक्यांविरहित जिराफचा जन्म झाला आहे. सोमवार दि. ३१ जूलैला जन्मलेला हा जिराफ सध्या ग्रहावर एकमेव ठिपक्यांविरहित जिराफ असण्याची शक्यता तज्ञ वर्तवत आहेत.

अमेरिकेतील टेनिसमधील ब्राइट नावाच्या एका खाजगी प्राणीसंग्रहालयात या पट्टे आणि ठिपक्यांविरहित जिराफचा जन्म झाला आहे. आश्चर्यकारक आणि कुतूहल निर्माण करणारं हे जिराफचं बाळ ६ फुट ऊंचीचं असुन ती मादी आहे. १९७२ च्याही आधी अशा प्रकारच्या ठिपकेविरहित (स्पॉटलेस) जिराफची नोंद टोक्योमध्ये करण्यात आल्याचं लक्षात आलं आहे. मात्र, त्यानंतर अशा प्रकारची नोंद जगभरात अद्याप कुठेही आढळुन आलेली नाही.

जगभरात आढळणाऱ्या जिराफच्या ४ प्रजातींपैकी ‘रेटिक्युलेटेड जिराफ’ मध्ये हा जिराफ मोडत असला तरी तो ठिपकेविरहित आहे. ‘रेटिक्युलेटेड जिराफ’च्या अंगावर बहुभुज तपकिरी रंगाचे ठिपके असतात त्यामुळे त्याला रेटिक्युलेटेड असा शब्द वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे जन्म देणारी मादी जिराफ सामान्य ठिपक्यांची मादी असतानाही तिच्या पोटी हा कसा जन्माला आला याबद्दल तज्ञ शोध घेत आहेत. अवघ्या काही दिवसांच्या असलेल्या या जिराफच्या बाळाची सध्या जगभर चर्चा रंगली आहे. त्याचे नामकरण होणं अजुन बाकी आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.