नुंह हिंसाचारातील आरोपी ओसामाला अटक, नल्हड मंदिराला लावली होती आग!

    24-Aug-2023
Total Views | 60
Nuh violence accused Osama arrested by Police

चंडीगड
: हरियाणाच्या मेवात प्रदेशात बृजमंडल यात्रेदरम्यान, ३१ जुलै २०२३ रोजी नूहं हिंसाचारात सहभागी असलेल्या आणखी एका आरोपीशी पोलिसांची चकमक झाली. दि.२३ ऑगस्ट रोजी झालेल्या चकमकीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. ओसामा उर्फ ​​पहलवान असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. हिंसाचाराच्या वेळी नल्हड मंदिराभोवती जाळपोळ करण्यात ओसामाचा हात असल्याचा आरोप आहे.

नूहं हिंसाचाराच्या वेळी नल्हड मंदिराजवळ भाविकांची वाहने जाळणाऱ्या जमावामध्ये आरोपी ओसामाचाही समावेश होता. घटना घडलेल्यापासून आरोपी ओसामा फरार होता. तसेच पोलीस त्याचा शोध घेत होते.मात्र दि. २३ ऑगस्ट रोजी पोलिसांना ओसामाचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी सापळा रचला तेव्हा आरोपी फिरोजपूर गावातून आली मेवकडे जाताना दिसला. उजीना कालव्याच्याजवळ पोलिसांनी ओसामाला घेरले असता त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार सुरु केल्यावर ओसामाच्या पायात गोळी लागली. पोलिसांनी ओसामाला तत्काळ अटक करून नल्हडच्या वैद्यकीय रुग्णालयात नेले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

झडतीदरम्यान आरोपींकडून अवैध देशी बनावटीचे पिस्तूल, एक रिकामी राऊंड आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. सायबर क्राईम पोलिस स्टेशन नूहंचे प्रभारी निरीक्षक विमल कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक होते. दंगलखोरांनी या सायबर क्राइम स्टेशनची तोडफोड करून आग लावली.नूहं हिंसाचारानंतर आरोपींना पकडण्यासाठी मोहीम राबवणाऱ्या हरियाणा पोलिसांची दोन आठवड्यांतील ही तिसरी चकमक आहे. याआधी १० ऑगस्ट रोजी पोलिसांनी नूहं हिंसाचारातील आरोपी मुनसैद आणि सैकुलचा सामना केला होता. दोघांना अटक करताना या चकमकीत एका आरोपीला गोळी लागली.

याशिवाय, दि २१ ऑगस्ट नूहं हिंसाचाराचा आरोपी आमिरची पोलिसांशी चकमक झाली. घटनेचे ठिकाण तावडू येथील अरवली टेकड्यांमधील सीलखो पर्वतावर बांधलेले एक अवशेष होते, जिथे आमिर लपला होता. पोलिसांना पाहताच आमिरने गोळीबार केला होता, ज्याच्या प्रत्युत्तरात त्यालाही गोळी लागली.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121